दौंडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कार्यालय व घरासमोर आक्रोश आंदोलन

सचिन आव्हाड

मराठा क्रांती मोर्चा दौंड शहर व तालुका यांच्यावतीने मराठा आरक्षण स्थगितीच्या निषेधार्थ व मराठा समाजाच्या इतर मागण्या त्वरित मान्य करण्यासाठी आमदार राहुल यांच्या निवासस्थानासह राजकीय पक्षांच्या कार्यालय आक्रोश आंदोलन करण्यात आले.

दौंड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय ,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कार्यालय, चौफुला येथील शिवसेना पक्ष कार्यालय, खुटबाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, तसेच राहु येथील भाजप आमदार राहुल कुल यांचे निवासस्थानी आक्रोश आंदोलन करण्यात आले.

यावेळी मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन दौंड च्या माजी आमदार रंजना कुल, माजी आमदार रमेश थोरात, भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा काचंन कुल यांना देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देत जोरदार घोषणाबाजी यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

Previous articleकोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर घरपट्टीला सुट मिळावी उरळी कांचन ग्रामस्थांची मागणी
Next articleराजेगाव येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न