सक्षम आरोग्य यंञणा उभारण्यासाठी प्रयत्न करणार खासदार डॉ.अमोल कोल्हे

Ad 1

पुणे- गेली कित्येक वर्ष सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याची खदखद शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाघोलीत व्यक्त केली.

शिरुर लोकसभेचे खासदार डाॕ.अमोल कोल्हे यांनी काल वाघोलीचा धावता दौरा केला यावेळी त्यांनी वाघोलीतील कोरोना परस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांच्या सोबत शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार हे देखील उपस्थित होता.

यावेळी बोलताना कोल्हे यांनी गेली कित्येक वर्ष सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगितले तर एकीकडे व्हेंटिलेटर असताना त्या ठिकाणी अनुुुुभवी डॉक्टर आहेत का
आणि दुसरीकडे अनुभवी डॉक्टर असताना त्या ठिकाणी व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत’ हे देखील पाहणे गरजेचं असल्याचे खासदार कोल्हे यांनी म्हटले.तर वाघोलीच्या लोकसंख्येच्या मानाने असलेला ८७ % रिक्वरी रेट हा खूप चांगला असून लोखसंख्येच्या मानाने कोरोनाचा प्रसार रोखण्यास सर्वाना यश आल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

तर वाघोलीत सुसज्ज हाॕस्टिटल साठी प्रयत्न करणार असून आता तात्पुरते प्राथमिक आरोग्य केंद्रात आॕक्सिजन बेडच्या उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न करणार आहे ग्रामपंचायत कर्मचाराचा झालेला मृत्यू दुर्दैवी असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळण्यासाठी देखील पाठपुरावा करणार आहे, तर येवढ्या मोठ्या ग्रामफंचायत मध्ये कोरोना रुग्णासाठी अद्यावत माहिती असणारा विभागीय आयुक्तलायाचा डॕश बोर्ड चालू नसल्याने नाराजी व्यक्त करून डॕश बोर्ड चालू करण्याच्या सुचना दिल्या.

यावेळी वाघोलीच्या सरपंच वसुंधरा शिवदास उबाळे माणिकराव सातव, राजेंद्र सातव,मारुती गाडे वैद्यकीय अधिकारी वर्षा गायकवाड, ग्रामविकास आधिकारी अनिल कुंभार यांच्या सह गावातील इतर पदाधिकारी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.