शरद गोरे यांची विधान परिषदेवर वर्णी लावा-ज्ञानेश्वर पतंगे

अमोल भोसले,पुणे

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक,साहित्य चळवळीचे हाडाचे कार्यकर्ते व मराठी साहित्य राष्ट्रीय पातळीवर पोहचवणारे लेखक शरद गोरे यांची साहित्यिक प्रतिनिधी म्हणुन विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणुन वर्णी लागावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त व ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यपाल कोटयातुन विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तीनां विधानपरिषदेवर सदस्य म्हणुन नियुक्त केले जाते. यात साहित्यिक या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून प्रतिथयश लेखक शरद गोरे यांना संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कोरोना महामारीच्या पाश्वर्भुमीवर प्रलंबित असलेली सदर सदस्याचीं येत्या काही दिवसांतच राज्यपाल यांचे द्वारा निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.यांपैकी साहित्यिक गोटातून विधान परिषदेच्या आमदारकी साठी शरद गोरे यांचेसह अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून शरद गोरे यांच्या नावाला पसंती असल्याची खात्रीशीर माहिती आहे. शरद गोरे हे १९९३ पासून अखिल भारतीय साहित्य परिषदेचे संस्थापक कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात जवळपास विदर्भ, मराठवाडा, कोकण,उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आदि ९४ ठिकाणी यशस्वी साहित्य संमेलने घेण्यात आली आहेत.ग्रामीण भागातील साहित्यिकांना एक विचारपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शरद गोरे हे अविरत कार्य करीत आहेत.गोरे यांनी त्यांच्या युगंधर या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास १२० पुस्तके प्रकाशित केली आहेत.

    छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला ‘बुद्धभूषण’ हा अत्यंत दुर्मिळ व महत्वपूर्ण ग्रंथ गोरे यांनी मराठी भाषेत काव्य स्वरूपात अनुवादित केला आहे. त्याच बरोबर शेतकरी आत्महत्या की हत्या या चिंतनशील ग्रंथाबरोबर एकूण ९ पुस्तकांचे लेखन केले आहे. आपल्या प्रभावी वकृत्तवासाठी ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत आजवर त्यांनीे शेकडो व्याख्याने दिली आहेत, छञपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज, महात्मा फुले,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या सह विविध विषयांवर व्याख्याने झाली आहेत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये बहिःशाल शिक्षण मंडळात ते अनेक वर्षांपासून ते व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पहिले प्रवक्ते म्हणून ते काम पाहत आहेत,त्यांनी रणागंण,प्रेमरंग या चित्रपटासह एकूण ५ चित्रपटांसाठी संगीत दिले आहे  व गीत लेखनही केले  आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे, प्रेमरंग, फाटक, ऐतवी,या चित्रपटाचे निर्माते आहेत,

नाटय,चित्रपट,संगीत व साहित्य या क्षेत्रात त्यांच्या नावाचा ठळकपणे उल्लेख केला जातो. प्रेमकवी म्हणून ते राज्यभरात प्रसिद्ध आहेत.अशा बहुआयामी साहित्यिकाची विधानपरिषदेवर वर्णी लागू शकते. शरद गोरे यांचे नाव विधानपरिषद सदस्य पदासाठी अचानक पुढे आल्याने राजकीय क्षेत्रात देखील चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान गोरे यांना प्रतिनिधित्व दिल्यास तळागाळातील साहित्यिकांना न्याय मिळेल असा दावा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चित्रपट साहित्य कला सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस विजय तुपे यांनी केला असून यांनी वरील आशयाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या मागणीसाठी ज्ञानेश्वर पतंगे यांचे नेतृत्वाखाली लवकरच शरद पवार यांचे भेटीसाठी जाणार असल्याची माहिती पतंगे यांनी दिली आहे.

निवेदनावर उस्मानाबाद, सोलापूर, बेळगाव,नाशिक, गोंदिया, अकोला, मुंबई, बेळगाव, पुणे, नांदेड, लातूर, नांदेड, धुळे, कोल्हापूर, पालघर, ठाणे, यवतमाळ, अमरावती,गडचिरोली, नागपूर,अहमदपूर, अहमदाबाद, उदगीर येथील असंख्य साहित्यिक, समीक्षक,पजकार व साहित्य प्रेमींची नावे या निवेदनावर आहेत.

Previous article“माझे गाव माझी जबाबदारी” या योजना अंतर्गत आव्हाट येथे घरोघरी आरोग्य तपासणी
Next articleप्रवीण होले यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड