“माझे गाव माझी जबाबदारी” या योजना अंतर्गत आव्हाट येथे घरोघरी आरोग्य तपासणी

राजगुरूनगर-आव्हाट (ता. खेड) येथे “माझे गाव माझी जबाबदारी” या योजना अंतर्गत नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये गावात कोणताही रूग्ण आढळून आला नाही.

या मोहिमेमध्ये आरोग्य सेवक कचरे साहेब, पोलिस पाटील वसंत गवारी,सरपंच सोमनाथ किर्वे,ग्रामसेवक गवारी मॅडम, ग्रामपंचायत सदस्य रोहिदास बुरूड,अंबरसेठ वाळूंज,शशिकांत अठारी,रमेश बुरूड,पुनाम शिंदे, रोहीनी चपटे,ग्रामपंचायत कर्मचारी सुधीर बुरूड,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी मान्यवर उपस्थित होते .या मोहिमेत सहा पथके करून सर्वेक्षण करण्यात आले

Previous articleसंतोषनगर येथे 2360 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
Next articleशरद गोरे यांची विधान परिषदेवर वर्णी लावा-ज्ञानेश्वर पतंगे