हवेली तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांची शुगर तपासणी

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

हवेली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक लोकमतचे पत्रकार सुखदेव भोरडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हवेली तालुका पत्रकार संघ, कर्मयोग परिवार व पंचशील फाऊंडेशनच्या माध्यमातून हवेली तालुका पत्रकार संघाच्या सदस्य बांधवांची शुगर तपासणी, BSL(R)तपासणी करण्यात आली. आपल्या संघाचे मानद सदस्य डॉक्टर मोहन वाघ सर यांनी लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील पत्रकार सदस्यांची शुगर तपासणी केली.

स्पर्धेच्या युगात बातमी मिळवण्यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते पण हवेली तालुका पत्रकार संघाने नेहमीच आरोग्याच्या दृष्टीने सातत्याने अतिशय स्तुत्य उपक्रम आतापर्यंत घेण्यात आले आहेत अशी माहिती पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक – हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल जगताप यांनी दिली.

यावेळी पत्रकार संघाचे जेष्ठ सल्लागार तुळशीराम घुसाळकर, माजी कोषाध्यक्ष जिल्हा पत्रकार संघाचे गणेश सातव, सचिन सुंंबे, धनराज साळुंखे, सचिन काळभोर, सुनिल तुपे, ओबीसी सेलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष टिळेकर, सोहम जगताप आदी सभासद बांधवांनी आपली तपासणी करुन घेतली.