डॉ. मदन कोठुळे यांनी शिक्षकांना मास्क व सॅनिटीझरचे केले वाटप

अमोल भोसले, उरळी कांचन

माणसाच्या जीवनात अनेक नाती असतात.. काही रक्ताची, तर काही त्यापेक्षाही घट्ट असतात. त्यातलंच एक नातं म्हणजे मैत्रीचं आणि दुसरं गुरु-शिष्याचं. ‘सदगुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी..’ या ओवीतून संत ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णलेला गुरुचा महिमा अत्यंत बोलका आहे. अनादी काळापासुन ‘गुरु’ समाजात वंदनीयच राहिले आहेत. माणसाला उत्कर्षाची वाट दाखवून त्याच्या आयुष्याला खरा अर्थ प्राप्त करून देण्याचे कार्य गुरु करतात.

जे जे आपणांसि ठावे, ते इतरांस सांगावे !!
शहाणे करुन सोडावे, सकल जन !!

या उक्तीप्रमाणे गुरु आपल्या शिष्याला घडवत असतात असे मत अखिल भारतीय हौशी मुष्टीयुध्द महासंघाचे उपाध्यक्ष डॉ मदन कोठुळे यांनी व्यक्त केले. उरुळी कांचन (ता.हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाच महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षकांना मास्क व सॅनिटीझर सहित स्टाड डॉ. मदन कोठुळे यांच्या वतीने देण्यात आले.

यावेळी प्राचार्य बबनराव दिवेकर, उपप्राचार्य भरत भोसले, गो.ग.जाधव, माजी कृषी अधिकारी माणिकराव कांचन, आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने, उद्धव पवार, महेश चुटके सह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleहवेली तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांची शुगर तपासणी
Next articleआत्मा व अमृत ऊस उत्पादकांचे नवे तंत्र जाणून घेण्यासाठी शिवार फेरीचे आयोजन