दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले प्लाझ्मा दान; प्लाझ्मा दान करण्याचे आमदार कुल यांचे आवाहन 

सचिन आव्हाड,दौंड

 महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे सुरुवातीच्या काळात शहरी भागापुरता मर्यादित असणारा कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात झपाट्याने वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी गुणकारी ठरत आहे परंतु रुग्णांची संख्या आणि प्लाझ्मादाते यांच्या संख्येत प्रचंड तफावत आहे ,प्लाझ्मा दात्यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर

 दौंड चे आमदार राहुल कुल यांनी आज प्रादेशिक रक्तपेढी- ससून सर्वोपचार रुग्णालय येथे जाऊन प्लाझ्मा दान केले.

संपूर्ण देश आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी गुणकारी ठरत आहे . यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईला अधिक बळकटी मिळावी यासाठी प्रत्येक कोरोना मुक्त नागरिकाने पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे . एकमेकांच्या साथीनेच आपण या संकटावर मात करू शकतो असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले .

Previous articleयुपीत पत्रकार विमा योजना सुरु मग महाराष्ट्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष का करतंय ? एस एम देशमुख यांचा सवाल
Next articleहवेली तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांची शुगर तपासणी