व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना वर मात करण्यासाठी दौंड तालुक्यात एकवटले तरुण

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुक्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी दौंड तालुक्यातील तरुण पुढे आले आहेत, त्यांनी रूग्णांना लवकर उपचार मिळावे यासाठी एक ग्रुप तयार केला असून यामार्फत प्लाझ्मा दान करण्यासाठी या तरुणांनी जनजागृती सुरू केली आहे.तसेच सर्व जनतेला सुरक्षित राहण्याचे,गर्दी न करण्याचे, काळजी घेण्याचे तसेच ज्यांना तप्तर सेवा हवी आहे यांच्यासाठी देखील हे तरुण काम करत आहेत.

प्लाझ्मा डोनर ग्रुप दौंड , कोविड हेल्प सेंटर , भारतीय जैन संघटना च्या माध्यमातून यामध्ये काम करीत असताना एकमेकाची ओळख नसतानाही मदत करण्याचा प्रयत्न या ग्रुप वर आहे.

या ग्रुप चे काम सर्व व्हाट्सअप मेसेज वर चालते व्हाट्सअप ग्रुप रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत करत आहे.यामध्ये प्रामुख्याने रमेश राठोड,जयेश ओसवाल, प्रसाद मुनोत, सौरभ भंडारी (दौंड) ,श्री हर्षल भटेवरा (राहू) ,मयुर सोळसकर (कासूर्डी), नितीन हेंद्रे , प्रमोद उबाळे (यवत) , संतोष कचरे (वरवंड) व सर्व तालुक्यातील आरोग्य सेवक यांनी पुढाकार घेऊन हे कार्य सुरू केले आहे,

करोना (COVID-19) वरती लस शोधण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे,लवकरच यावरती खात्रीपूर्वक उपचार पद्धत शोधली जाईल परंतु, करोनाबाधित रुग्णांना बरं करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी उपयोगी पडत असल्याचं समोर आलंय,यामुळे गरजुना लवकरात लवकर सुविधा मिळावी म्हणून
अजून प्लाज्मा दान विषयी जनजागृती होणे खूप गरज आहे
ग्रुपने आत्तापर्यंत 72 लोकांना प्लाझ्मा मिळवून दिला आहे
13 पेशंटला ला बेड मिळवून देणे
24 पेशंटला रेमेडीसिवर इंजेक्शन्स मिळवून देण्यास मदत
गरीब व गरजू लोकांना मोफत रक्त मिळवून देणे
कोरोना संबंधी इतर काही औषधे ,रुग्णवाहिका लागल्यास उपलब्ध करून देणे समुपदेशन करणे रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताची गरज भागविणे अशा प्रकारचे कार्य करीत आहे.

सदर ग्रुप मधे तालुक्यातील व्यापारी , सेवाभावी संस्था ,सरकारी व खासगी डॉक्टर , फार्मासिस्ट ,पोलीस , सर्व पत्रकार , प्रशासन , नेते मंडळी, नोकरदार वर्ग व इतरही व्यस्त कार्यकर्ते एक सामाजिक बांधिलकी म्हणून दौंड तालुक्यामध्ये व जिल्ह्यांमध्येही करोणा ग्रस्तांना व नातेवाईकांना मदतीचा हात देत आहे व अजून पुढे चालू राहील आमच्या ग्रुप तर्फे आवाहन करण्यात येते की आपण करोना आजारातून बरे झाला आहात, त्यामुळे तुमच्या शरीरात कोविडशी लढणाऱ्या Anti-Bodies(प्रतिपिंडे) तयार झाली आहेत. प्लाझ्मा थेरपीद्वारा ह्या Anti-Bodies(प्रतिपिंडे) इतरांना दान करून तुम्ही एखाद्याला जीवनदान देऊ शकता

Previous articleपोलिस पाटीलांना 50 लाख रुपये विम्याचे कवच लागू करण्याची आमदार राहुल कुल यांची मागणी
Next articleसामाजिक बांधिलकी जपत काळुस गावचे माजी सरपंच पवन जाचक यांनी केले प्लाझ्मा दान