सामाजिक बांधिलकी जपत काळुस गावचे माजी सरपंच पवन जाचक यांनी केले प्लाझ्मा दान

चाकण-काळुस (ता.खेड) गावचे माजी सरपंच पवन फक्कडशेठ जाचक यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी कोरोणा बाधित रुग्णाला प्लाझ्मा दान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

काळुस गावच्या विकासासाठी अहोरात्र गावासाठी सेवा करत असताना त्यांना अखेर कोरोनानेच गाठले होते मात्र कोरोना वर मात करून ते बरे झाले व एक महिना झाला यामध्येच त्यांचे कुटुंबातील आधारस्तंभ प्रगतिशील कै प्रकाश दादा यांच्या निधनाने कुटुंबावर खूप मोठा आघात झाला परंतु माजी सरपंच पवन जाचक यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्यामुळे एखाद्याचा जीव वाचत असेल तर आपण समाजाचे देणे लागतो म्हणून स्वतः रक्तदान प्लाझ्मा दान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.अशा सरपंचांना धन्यवाद देईल तेवढे कमीच आहे.

सरपंच यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा.गावच्या विकासासाठी मोलाचं योगदान देता देता समाजासाठीही योगदान देणाऱ्या सरपंचाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Previous articleव्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना वर मात करण्यासाठी दौंड तालुक्यात एकवटले तरुण
Next article“माझे कुटुंब माझी जबाबदारी”योजनेचा आमदार अशोक पवार यांच्या हस्ते शुभारंभ