निर्मलाताई पानसरे यांच्याकडून पत्रकारांना ‘कोरोना सुरक्षा किट’ चे वाटप

Ad 1

राजगुरूनगर-पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्यावतीने, आमदार दिलिप मोहिते पाटील यांच्या हस्ते खेड तालुक्यातील पत्रकारांना कोरोना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषि सभापती अरुण चांभारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर, अॅड. सुखदेवतात्या पानसरे, अॅड.मनिषा टाकळकर-पवळे व खेड तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

यावेळी आमदार मोहिते पाटील म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, जनतेच्या हितासाठी त्यांची भूमिका ते परखडपणे निभावतात याचा अभिमान आहे. तालुक्याच्या भल्यासाठी मी लढत राहणार, पत्रकार बांधवांनी माझ्या लढ्याला साथ द्यावी. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत पानसरे ताईंनी कोरोना सुरक्षा किट वाटपाचा घेतलेला कार्यक्रम गौरवास्पद आहे.

खेड पंचायत समितीच्या शिवछत्रपती सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी केले. पत्रकारांच्या वतीने कोंडीभाऊ पाचारणे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकनेते धर्मराज पवळे यांनी केले. पत्रकार अमित टाकळकर यांनी आभार मानले.