पीएमपीएमएल’ची बस सेवा यवत पर्यंत सुरु करा – सुशांत दरेकर

Ad 1
पुणे पीएमपीएमएलची बस सेवा यवत पर्यंत सुरू करण्यात यावी याबाबत  पुणे महानगर चे संचालक शंकर पवार यांना निवेदन देण्यात आले ही बस सेवा सुरू झाली तर परिसरातील शेतकरी, व्यापारी,उद्योजक,विद्यार्थी,नोकरदार व इतराना याचा फायदा होईल असे मत दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
तसेच दौंड तालुक्यातील स्वारगेट ते यवत पर्यंत बस सेवा तातडीने सुरू करावी. दौंड तालुक्यातील बोरीभडक, बोरीऐंदी सहजपुर,नांदुर, खामगाव,कासुर्डी व यवत या गावांतुन मोठ्या प्रमाणात विद्यार्थी,कामगार, वृद्ध व इतर नागरिक कामानिमित्त पुणे शहर येथे प्रवास करतात.परंतु महानगर बस सेवा पुणे सोलापुर मार्गी होणारी बस सेवा ऊरूळी कांचन पर्यंतच मर्यादित असल्यामुळे या सर्व गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागात औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात असुन महिला वर्ग औद्योगिक वसाहतीमध्ये कामासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
बस सेवा सुरू झाल्यास सर्व शेतकरी वर्गाला याचा फायदा घेता येईल. ऊरूळी कांचन ते यवत किलो मिटर अंतर १४ असल्याने स्वारगेट- हडपसर ते यवत (ता दौंड)या ठिकाणी बस सेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. तसेच दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी देखील फोनद्वारे पुणे महानगर चे संचालक शंकर पवार यांना देखील माहीती देऊन बस सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी विनंती केली. बऱ्याच वर्षापासून येथील नागरिकांची बससेवा सुरू व्हावी अशी मागणी आहे .अशी माहिती दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य सुशांत दरेकर यांनी दिली.
जाहिरात