जयंत टावरे यांचा “कोरोना योध्दा “पुरस्काराने सन्मान

Ad 1

पुणे- ग्रामविकास प्रतिष्ठान(महा.राज्य)या संस्थेचे संचालक,राष्ट्रीय खेळाडू, आदर्श क्रीडाशिक्षक ( कोनगाव, ता.भिवंडी. जि.ठाणे) येथील उपसरपंच जयंत गोपाळ टावरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या वतीने “कोरोना योध्दा “पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद भोईर यांच्या शुभहस्ते व ओबीसी महिला मोर्चा प्रदेश संघटनप्रमुख वनिता लोंढे,ठाणे शहर जिल्हा ओबीसी मोर्चा प्रमुख नयना भोईर,डाॅ अमोल कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंत टावरे यांना पुरस्कार देण्यात आला.

कोरोना समस्येने गेली सात महिने जयंत टावरे यांनी नागरिकांना योग्य उपचार मिळावे ,अडचणी उद्भवू नये यासाठी खासदार कपिल पाटील ,कोनगावच्या सरपंच डाॅ रूपाली कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र परिश्रम घेतले.दोन महिन्यांपूर्वी टावरे यांनी स्वतः कोरोनावर सुद्धा मात करून पुन्हा सक्रीयपणे कार्यरत आहेत.खेड तालुक्यातील सेझ प्रकल्पातील अवैध उत्खनन प्रकरणी जयंत टावरे यांनी आझाद मैदान येथील आंदोलनातही सहभाग घेतला होता.

ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे,कार्याध्यक्ष विलासराव भोईर, उपाध्यक्ष विलासराव शिंदे,सेक्रेटरी सुभाषराव गोरडे, संचालक रामदासशेठ दौंडकर यांनी टावरे यांचे अभिनंदन केले आहे.