नारायणगाव परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०० गरीब कुटुंबांना किराणा वाटप

नारायणगाव (किरण वाजगे)

रोटरी क्लब नारायणगाव हायवे, टेक महिंद्रा फाउंडेशन, रोटरी फाउंडेशन, रोटरी क्लब पुणे डेक्कन जिमखाना, मैत्री संस्था पुणे ,ऊर्मी संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज वळणवाडी , नंबरवाडी , ठाकरवाडी (वारूळवाडी) , नगदवाडी , आर्वी केंद्र परिसरात सुमारे २०० गरीब कुटुंबांना अंदाजे दोन लाख चाळीस हजार रुपयांचे मोफत किराणा किटचे सोशल डिस्टंसिंग चे पालन करून वाटप करण्यात आले.


कोरोना मुळे गरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून या संस्थांकडून त्यांना एक मदतीचा हात देण्याचा या संस्था प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी देखील आदिवासी भागात ५०० किराणा किट वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास रोटरी क्लब डेक्कन जिमखान्याच्या माजी अध्यक्षा व डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या प्रोजेक्ट डायरेक्टर मंजू फडके मॅडम, रो. विश्वास फडके, डिस्ट्रिक्ट 3131 झोनल डायरेक्टर रो. डॉ. पंजाबराव कथे, रो. राम भालेराव, रो. नंदकुमार चिंचकर, रो. रवींद्र वाजगे उपस्थित होते.


प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी शांताराम डोंगरे, मनोहर वायकर ,मनोहर भोसले, रियाज मोमीन, धनश्री तोडकर, मंगेश मेहेर, भारती आल्हाट व साईनाथ कनिंगध्वज यांनी प्रयत्न केले.

Previous articleपीएमपीएमएल’ची बस सेवा यवत पर्यंत सुरु करा – सुशांत दरेकर
Next articleखोरची दुष्काळी ओळख पुसली जाणार -नितिन दोरगे