खोरची दुष्काळी ओळख पुसली जाणार -नितिन दोरगे

दिनेश पवार,दौंड

गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या दौंड तालुक्यातील खोर ह्या गावाची ओळख ही आता पुसली जाणार असून खोरचा परिसर हा सुजलाम-सुफलाम होत आहे. आगामी काळात हाच परिसर वृक्षारोपणाच्या माध्यमातून एक हरित गाव होणार असल्याचे दौंड पंचायत समितीचे उपसभापती नितिन दोरगे यांनी सांगितले आहे. खोर (ता. दौंड) येथे विद्यार्थी साहाय्यक समिती संस्था पुणे येथील आशीर्वाद वृक्ष उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नितिन दोरगे बोलत होते.

या कार्यक्रमाचे उदघाटन पुणे जिल्हा परिषदचे सदस्य गणेश कदम, दौंड पंचायत समितीचे उपसभापती नितिन दोरगे, सरपंच सुभाष चौधरी, बाजार समितीचे संचालक रामचंद्र चौधरी, नाभिक संघाचे अध्यक्ष गणेश साळुंके यांच्या उपस्थितीत या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यी सहायक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, सुनील चोरे, गणेश काळे, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड़, तुषार रंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यात ६० झाडे व ६० सुरक्षा जाळी देण्यात आल्या. १००० आशीर्वाद वृक्ष जतन हे ह्या समितीचे ब्रीद असून वसतिगृहात असणाऱ्या अशा दौंड तालुक्यातील प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना ह्या झाडांचे वाटप करण्यात आले असून ह्या विद्यार्थ्यांनी त्याचे काटेकोर पने पालन करुन गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खोर मध्ये विद्यार्थ्यी अवधूत अत्रे, गोरख चौधरी यांनी या वृक्षारोपणाचे आयोजन केले होते. वस्तिगृह कमवा व शिका अंतर्गत प्रत्येक झाडांंच्या मागे ५०० रुपये आर्थिक मदत करीत आहेत.

यावेळी भगवान चौधरी, संजय डोंबे, तंटामुक्तीचे अध्यक्ष राहुल चौधरी, बाळू डोंबे, दत्तात्रेय शिंदे, बापू शेंडगे, रविंद्र अत्रे, बाळासाहेब अर्जुन, विकास चौधरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या दौंड तालुक्यातील खोर ह्या गावाची ओळख ही आता पुसली जाणार असून खोरचा परिसर हा सुजलाम-सुफलाम होत आहे. आगामी काळात हाच परिसर वृक्षारोपणाच्या माध्यमातून एक हरित गाव होणार आहे-नितिन दोरगे (उपसभापती, दौंड पंचायत समिती)

Previous articleनारायणगाव परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०० गरीब कुटुंबांना किराणा वाटप
Next articleअखिल भारतीय वारकरी मंडळ दौंड तालुका नविन कार्यकारणी नियुक्तीपत्रक प्रदानसोहळा संपन्न