कॅशक्रेडीट कर्जयोजना व पगार बँकेत जमा होणाऱ्या खातेदारांनासाठी विमा योजना लागू करा

Ad 1

दिनेश पवार,दौंड

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे या बँकेतून राबवल्या जाणाऱ्या वैयक्तिक कॅशक्रेडीट कर्ज योजनेसाठी कर्जदार व जामीनदार यांच्यासाठी बँकेची विमा योजना असावी तसेच ज्या कर्मचारी- अधिकारी यांचा पगार आपल्या बँकेतून होतो त्यांनाही विमा योजना लागू करण्यात यावी .वैयक्तिक कॅशक्रेडिट योजनेचा व्याजदर कमी करण्यात यावा व कॅश क्रेडीट योजनेची कर्ज मर्यादा वाढवण्यात यावी .बँकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या विमा योजनेचा लाभ अपघाती व नैसर्गिक मृत्यू झालेल्या पगारदार खातेदारांना व नाममात्र सभासद झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात यावा .वैयक्तिक कॅशक्रेडिट योजनेचे नुतनीकरण दरवर्षी न करता ही मर्यादा तीन वर्षापर्यंत वाढविण्यात यावी .नाममात्र सभासदासाठी कर्ज देताना बँक जामीनदार घेत असल्यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान होत नाही .परंतु कर्जदाराचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या व जमीनदारांच्या कुटुंबाची आर्थिक हेळसांड होते व त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते .या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्या बँकेचे खातेदार व व वैयक्तिक कॅशक्रेडिटसाठी नाममात्र सभासद झालेल्यांना विमा योजना सुरू करून त्याचा लाभ लवकर देण्यात यावा अशी मागणी करणाऱ्या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठवण्यात आली आहे.

यावेळी श्री गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी श्री शंकर घोडे श्री जयवंत पवार श्री सुनील रुपनवर श्री विनायक कांबळे श्री विजय जाधव श्री विनोदकुमार भिसे श्री आप्पा जगताप श्री हौशीराम गायकवाड श्री मिलिंद थोरात हे पदाधिकारी उपस्थित होते .