यवत येथे घरोघरी कोरोना तपासणी

दिनेश पवार,दौंड

यवतमध्ये कोरोनाचा प्रसार वाढतच आहे वाढत्या कोरोना चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आता घरोघरी तपासणी मोहीम करण्यात आली,दौंड तालुक्यातील सात मोठ्या लोकसंख्या च्या गावामध्ये महासर्वेक्षण करण्यात आले यामध्ये दुसऱ्या टप्प्यात यवत व राहू गावातील सर्वेक्षण करण्यात आले.

या सर्वेक्षणासाठी आवश्यक असणारे सर्वेक्षणाचे साहित्य जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम व पंचायत समिती दौंड चे उपसभापती नितीन दोरगे यांच्या हस्ते देण्यात आले,यावेळी तहसीलदार संजय पाटील,गटविकास अधिकारी अमर माने,ग्रामपंचायत प्रशासक गोरक्षनाथ हिंगणे,मंडल अधिकारी रमेश कदम,तलाठी मनोज तेलंग, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे आदी उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने एकूण 83 टीम तयार करून हा महासर्वे करण्यात आला.

आमच्या प्रतिनिधी शी बोलताना पंचायत समितीचे उपसभापती नितीन दोरगे म्हणाले की कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे,प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत, नागरिकांनी देखील काळजी घेतली पाहिजे, मास्क,सॅनिटायजर, साबण यांचा वापर करून सोशल डिस्टन्स पाळणे खूप गरजेचे आहे, प्रशासनाने दिलेले नियम पाळून मीच माझा रक्षक हे तत्व प्रत्येकाने मनी बाळगून खबरदारी घेतली तर कोरोना प्रादुर्भाव नक्कीच आपण आटोक्यात आणू

Previous articleकॅशक्रेडीट कर्जयोजना व पगार बँकेत जमा होणाऱ्या खातेदारांनासाठी विमा योजना लागू करा
Next articleअखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी सुपूर्द