दावडी येथील रुपाली गव्हाणे व संगिता होरे यांची खेड पोलिस ठाण्या अंतर्गत महिला दक्षता समिती पदी निवड

राजगुरूनगर-खेड तालुक्याच्या पुर्व भागातील दावडी येथील रुपाली दिपक गव्हाणे, संगिता सुरेश होरे यांची खेड पोलिस ठाण्या अंतर्गत महिला दक्षता समिती पदी निवड करण्यात आली आहे. याबाबत नियुक्तीचे पत्र खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांनी नुकतेच दिले आहे.


तालुक्यातील पुर्व भागातील दावडी ह्या गावाला अनेक गावे वस्त्या जोडल्यामुळे दिवसे दिवस या गावाचा विस्तार होत आहे. त्यांच भांडण तंटा यांचेही प्रमाण वाढत आहे. नवरा बायकोची भांडणे हे प्रमाण सुद्धा वाढले आहे.महिलां व मुलीना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. विशेषत कामाच्या ठिकाणी काही व्यक्ती त्यांच्या पदाचा व स्त्रीच्या असाहाय्यतेचा फायदा घेत स्त्रियांचे शोषण करत असल्याच्या अनेक घटना घडतात.

या प्रकारच्या लैंगिक छळाविरोधात आवाज उठविणाऱ्या महिलेची कामावरील सेवासुविधा बंद करत, धाक दाखवून आदी माध्यमातून त्यांची गळचेपी केली जाते. पीडित महिलेच्या पाठिशी त्यांचे सहकारी राहत नाही. अशा वेळी एकटे पडण्याचा धोका असल्याने महिला फारशा पुढे येत नाही. या पार्श्वभूमीवर, महिला तक्रार निवारण ,सुरक्षा यावर दक्षता समितीद्वारे संघर्षगस्‍त महिलांना कायदेविषयक सहाय्यता मिळवून देण्‍याकरिता पोलीसांच्‍या मध्‍यस्थिने पुर्ण सहकार्य करण्‍यात येते. पुर्व भागात आजपर्यत दक्षता कमिटीमध्ये काम करणारी एकही महिला नसल्याने रुपाली गव्हाणे, व संगिता होरे यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव,दावडी बीटचे पोलिस अंमलदार संतोष मोरे, गोपिनिय विभागाचे संदीप भापकर, दावडी माजी सरपंच संतोष गव्हाणे, उद्योजक संभाजी आबा घारे उपस्थित होते. गव्हाणे, होरे यांच्या निवडीनंतर दावडी परिसरातील महिला व मुली  समाधान व्यक्त करित आहे

Previous articleग्रामीण पत्रकारांना कोव्हिड सेंटर मध्ये राखीव बेड ठेवण्याची NUJM ची मागणी
Next articleमाझा प्रभाग माझी जबाबदारी” या अनुषंगाने नागरिकांना नगरसेवक विशाल नायकवाडी यांनी घरोघरी केले स्टिम मशीनचे मोफत वाटप