माझा प्रभाग माझी जबाबदारी” या अनुषंगाने नागरिकांना नगरसेवक विशाल नायकवाडी यांनी घरोघरी केले स्टिम मशीनचे मोफत वाटप

चाकण- नगरपरिषदेचे स्विकृत नगरसेवक विशालभाऊ नायकवाडी यांनी आज शुक्रवार (दि. 18) रोजी ” माझा प्रभाग माझी जबाबदारी” या अनुषंगाने प्रभाग क्र. 02 मधील नागरिकांना स्टिम मशीनचे (वाफेचे यंत्र) घरोघरी जाऊन मोफत वाटप करण्यात आले.

या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. याप्रसंगी राहुल अंकुश नायकवाडी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी विशाल नायकवाडी यांनी सांगितले की, सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे. या करिता खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या प्रभागातील नारिकांना वाफेचे मशिन मोफत देऊन त्यांचे आरोग्य उत्तम रहाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करित आहे.

लाॅकडाऊनच्या काळात गरजुंना भाजीपाला असेन जेवनाचे डबे आम्ही पुरवत होतो. त्यानंतर अर्सेनिकम अल्बम 30 या रोगप्रतिकार शक्ती वाढीच्या गोळ्यांचे देखिल वाटप केले आहे.
आता वाफेच्या मशिनचा तुटवडा मार्केट मधे जाणवला त्यामुळे नागरिकांना वाफेचे मशिनसाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे.

त्यामुळे मी स्वतःच्या खर्चातुन नागरिकांना वाफेचे मशिन मोफत उपलब्ध करून दिले, याकामी मला आमचे बंधु राहुल अंकुश नायकवाडी यांनी मोलाची मदत केली, तेव्हा नारिकांच्या वतिने त्यांना धन्यवाद देतो. येथुन पुढच्या काळात देखिल याही पेक्षा मोठी मदत करण्याची माझी तयारी आहे.

माझा प्रभाग हा प्रभाग राहिला नसुन ते एक माझं कुटुंबच आहे हे मी समजतो. म्हणुन या अडचणीच्या काळात मी माझी जबाबदारी निश्चितच सक्षमपणे पार पाडेल, अशी माझ्या प्रभागातील नागरिकांना ग्वाही देतो.

Previous articleदावडी येथील रुपाली गव्हाणे व संगिता होरे यांची खेड पोलिस ठाण्या अंतर्गत महिला दक्षता समिती पदी निवड
Next articleजुन्नर तालुक्यात चंदन चोराला मुद्देमालासह अटक