जैदवाडी येथे रब्बी ज्वारी बियाणे वाटप व शेतकरी प्रशिक्षण

Ad 1

बाबाजी पवळे, राजगुरूनगर- जैदवाडी (ता. खेड)येथे तालुका कृषि अधिकारी खेड कार्यालयामार्फत रब्बी हंगाम सन २०२०-२०२१ अंतर्गत रब्बी ज्वारी बियाणे वाटप व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सोमवार (दि,१४) रोजी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल कृषी अधिकारी  राम वाळुंज ,कविता रोडे कृषि सहाय्यक  यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जैदवाडी येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमा अंतर्गत १० हेक्टर क्षेञावर रब्बी ज्वारीचा प्रकल्प घेण्यात आला असून यानिमीत्ताने शेतकऱ्यांना रब्बी ज्वारी लागवड व उत्पादन तंत्रज्ञान मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

सदरच्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे फुले सुचिञा या वाणाचे बियाणे हेक्टरी दहा किलो.याप्रमाणे अनुदानावर वाटप करण्यात आले.सदरच्या प्रकल्पाअंतर्गत प्रती हेक्टरी १० किलो ज्वारी बियाणे बिजप्रकिया करण्यासाठी गंधक ४० ग्रँम (शेतकरी स्व खर्चाने)जैविक खते, अँझेटोबँक्टर व पी एस बी एक लीटर प्रती हेक्टरी झिंक विरघळविणारे जिवाणू दोन लिटर प्रती हेक्टरी जैविक किड नियंत्रणसाठी चार फेरोमन सापळे.पिकसंक्षणासाठी निमार्क चार लीटर प्रती हेक्टर याप्रमाणे पँकेज वाटप पंचवीस शेतकऱ्यांना करण्यात आले. सदरच्या प्रशिक्षणामध्ये रब्बी ज्वारी लागवड व उत्पादन तंञज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन श्रीमती कविता रोडे सहाय्यक कृषि अधिकारी खेड यांनी केले जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंभा (बी बी एफ यंञाने) यंञाने पेरणी केल्याने उत्पादन होणारी वाढ याबाबत मार्गदर्शन करुन बी बी एफ यंञाने पेरणी करण्याबाबतचे आवाहन व मार्गदर्शन केले. सदरच्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड नँडेपखत गांडूळखत युनिट उभारणी याबाबतचे मार्गदर्शन मंडल कृषि अधिकारी राम वाळुंज यांनी केले.प्रशिक्षण कार्यक्रमांत शेतकऱ्यांना कृषि विभागामार्फंत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना ,प्रधानमंञी पिक विमा,योजना कृषियांञीकीकरण, प्रधानमंञी कृषि सिंचन योजना,पी एम किसान व इतर योजना बाबतचे मार्गदर्शन तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब मांदळे यांनी केले .

या शेतकरी प्रशिक्षण वर्गास जैदवाडी गावाच्या सरपंच सौ. शितल जैद ,विकास जैद,आर टी आय कार्यकर्ते गंगाराम जैद,उपसरपंच मच्छिद्र कोतवाल, कृषिमिञ आनंदा जैद, वि.का.स सोसायटीचे संचालक भगवान जैद,ह.भ.प सुभाष महाराज जैद,दिपक जैद,गणपत जैद(टोपीवाले) ,तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब मांदळे, राम वाळुंज मंडल कृषि अधिकारी खेड,श्रीमती कविता रोडे सहाय्यक कृषि अधिकारी,खेड व परिसरातील महिला व इतर शेतकरी हजर होते .या कार्यक्रमाचे सुञसंचालन कविता रोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ह.भ.प सुभाष महाराज जैद यांनी केले.