नगरसेविका करूणाताई चिंचवडे प्रभागाच्या विकासासाठी सदैव तत्पर !!

अतुल पवळे, पुणे

नगरसेविका सौ करुणा शेखर चिंचवडे यांचे पाठपुराव्यातून लवकरच प्रभागातील काम पूर्णत्वाकडे नेणार आहेत. आज प्रभागातील विकासकामाच्या प्रकल्प पाहणी दौऱ्यात बिजलीनगर अंडरपास, आहेर गार्डन ते चिंतामणी मंदिर येथील रस्ता काँक्रीटीकरण, गिरीराज हौसिंग सोसायटी येथील रस्ता काँक्रीटीकरण येथील प्रकल्प विकासकामांना आज भेटी दिल्या, बिजलीनगर अंडर पास च्या बाबतीत सुरवातीच्या काळात काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे काम संथ गतीने पुढे सरकत होते, मात्र येथून पुढील काळात कामास गती देऊन लवकरात लवकर युद्धपातळीवर काम करून काम पूर्ण कण्यावर भर दिला जाईल.

या प्रकल्पात खोदाईकामामध्ये BSNL / MSEB च्या मोठमोठ्या केबल्स, ड्रेनेज लाइन्स, बिजलीनगर पाण्याची टाकी व संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करणारी पाणीपुरवठा विभागाची मेन लाइन असून त्या तुटत असल्याने काम करत असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये या कडे लक्ष देणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने पुढील कामासाठी जास्त क्षमतेची यंत्रणा वापरून युद्धपातळीवर काम पूर्णत्वाला न्यावे यासाठी प्रशासन,संबंधित प्रकल्प सल्लागार यांचेशी चर्चा केली.

लवकरच मा. आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कामाच्या मुदत वाढीबाबत चर्चा करणार आहे, आहेरनगर ते चिंतामणी मंदिर तसेच गिरीराज हौसिंग सोसायटी बिजलीनगर या मधील रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून या कामांना देखील युद्धपातळीवर गती देण्यात आली आहे

Previous articleकोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर चाकण येथील भोर बी बियाणे राबवत आहे शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम
Next articleजैदवाडी येथे रब्बी ज्वारी बियाणे वाटप व शेतकरी प्रशिक्षण