पुणे सोलापूर हायवे वर झालेला सिनेस्टाईल दरोडा दौंड पोलिसांकडून उघड

दिनेश पवार,दौंड

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वृंदावन हॉटेल समोर मळद हद्दीत सिनेस्टाईल पध्दतीने चोरट्यांनी घातलेला दरोडा दौंड पोलीसानी उघड केलेला असून यातील पाच आरोपींना अटक केलेली असून त्यांच्याकडून एकूण 19 लाख रुपये रक्कम जप्त केलेली आहे, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या तीन काळ्या रंगाच्या पल्सर गाड्याही जप्त केल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 29 ऑगस्ट रोजी पुणे सोलापूर हायवेवर वृंदावन हॉटेल शेजारी मळद हद्दीत रेल्वे ब्रिज जवळ पुण्यकडून सोलापूर कडे पोल्ट्री चे खाद्य आणण्यासाठी जाणाऱ्या टेम्पोवर चोरट्यांनी सांयकाळी 7 च्या दरम्यान सिनेस्टाईल पध्दतीने दरोडा टाकून 29 लाख रुपये लुटून रावणगाव कडे पलायन केले ही माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तत्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून परिसरातील नागरिकांना कळवली एकाच वेळी सुमारे 60 हजार लोकांपर्यंत माहिती मिळाल्यामुळे परिसरातील नागरिक सावध झाले व सर्वत्र शोध घेऊ लागले,यावेळी पाटस टोलनाका कडून बारामती कडे जाणाऱ्या एका नागरिकाने हा संदेश ऐकला व त्याच वर्णनाची गाडी गाडी जात असताना त्याचा पाठलाग केला .यावेळी दोन चोरट्यांनी गाडी सोडून पलायन केले सदर ठिकाणी विना नंबर ची गाडी व 828200 रुपये ची बॅग सापडली,सदर गाडी च्या इंजिन नंबर यावरून शोध लावत पुढे यवत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाटस पोलीस चौकीचे अंमलदार पानसरे यांनी पहाटेच्या वेळी टोलनाका जवळ प्रकाश पांडुरंग गोरगल (वय 36 राहणार वाखारी ता.दौंड) याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून 210000 रुपये मिळाले,यानंतर कटात सहभागी असणाऱ्या विक्रम विलास शेळके (वय 23 राहणार वाखारी) याला अटक केली यांच्याकडे चौकशी केली असता दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली व कट रचणारा मास्टर माईंड मंगेश चव्हाण याचे नाव पुढे आले व त्याने इतर चार आरोपी सुपारी देऊन आणले होते, त्यांची नावे उघड होण्यास वेळ लागत होता,पोलिसांनी तांत्रिक तपास करून जाडया उर्फ पैगंबर तययब मुलाणी (वय ,20 वर्षे राहणार, आमराई बारामती), अख्या उर्फ अक्षय बाळासाहेब वावरे (वय, 20 वर्षे, राहणार माळेगावं, बारामती), मनोज बाळासाहेब साठे (वय.22 वर्षे राहणार. रुई,बारामती) या आरोपींना ताब्यात घेतले सुरुवातीला तो मी नव्हेच हा पवित्रा या आरोपींनी घेतला होता परंतु पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून या गुन्ह्यात वापरलेली आणखी दोन पल्सर व 836722 इतकी रक्कम व गुन्ह्यात वापरलेले हत्यारे जप्त केली आहेत,या गुन्ह्यात आतापर्यंत 19 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आलेली आहे, या कटातील मास्टर माईंड मंगेश चव्हाण व साथीदार किशोर मोरे हे दोघे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, यातील फिर्यादी हे लोणी काळभोर येथील असून त्यांनी ही रक्कम पोल्ट्री फीड खाद्य ची असल्याचे सांगितले आहे मात्र ही रक्कम गुटखा व्यवसायातील असल्याचा संशय पोलिसांचा असून याबाबत रक्कम नेमकी कशाची याची चौकशी पोलीस करत आहेत.

सदरचा तपास पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी टोम्पे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,सहाय्याक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी,पोलीस कर्मचारी सूरज गुंजाळ, महेश पवार, हेमंत भोंगळे, पोलीस नाईक-सुभाष मलगुंडे,पोलीस नाईक संजय देवकाते, पोलीस शिपाई जब्बार सय्यद, किशोर वाघ,नारायण वलेकर, पोलीस नाईक रमेश काळे,पोलीस नाईक-महेश भोसले,पोलीस नाईक-सुनील सस्ते,पोलीस नाईक-सचिन बोराडे,यांनी इतर सर्व बंदोबस्त सांभाळून अत्यंत मेहनतीने हा तपास केलेला आहे.

ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे सर्व गुन्हे कमी झाले आहेत, घटनेची माहिती मिळताच सर्व दक्ष होतात यामुळे मागील मार्च पासून सर्व गुन्हे कमी झाले आहे, जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा चा प्रथम वापर दौंड मध्ये करण्यात आला यामुळे पोलीस व समाज एकत्र आले असून याचा सर्वांना खूप फायदा होत असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले

Previous articleमराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा – संभाजी ब्रिगेडची मागणी
Next articleमराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अधिवेशनात बाजू मांडण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमदार दिलीप मोहिते यांना निवेदन