मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा – संभाजी ब्रिगेडची मागणी

 

सचिन आव्हाड, दौंड

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा या मागणीसाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आज दौंड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे. याचा महाराष्ट्रातील मराठा समाजाला सर्वच क्षेत्रात फटका बसणार आहे.मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय होईपर्यंत कोणत्याही स्वरुपाची शासकीय नोकर भरती करण्यात येऊ नये, तसेच मराठा आरक्षण लागू असलेले सध्याचे आरक्षण कायम ठेवण्याचा आध्यादेश सरकारला काढता येतो तो अध्यादेश सरकारने त्वरित काढून मराठा आरक्षणाचा लाभ मराठा समाजात कायम चालू ठेवावा या प्रमुख मागणीसह मराठा समाजात लागू असलेले सध्याचे शासकीय-निमशासकीय शैक्षणिक आरक्षण कायम ठेवून मराठा समाजाची होणारी फरपट थांबवण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे. अशा विविध मागण्या सह दौंड तहसील कार्यालयामार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

 

समाजाच्या मागण्यांचा शासन दरबारी विचार न झाल्यास आगामी काळात संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुनील पासलकर यांनी दिला.

यावेळी संभाजी ब्रिगेड चे दौंड तालुका अध्यक्ष सुनील पासलकर , संभाजी ब्रिगेड चे दौंड अध्यक्ष गणेश भोसले , उपशहराध्यक्ष अमोल पवार,दौंड तालुका उपाध्यक्ष कुलदीप गाढवे, संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस विजय भोसले,संभाजी ब्रिगेड दौंडचे पदाधिकारी, तसेच मराठा सेवा संघाचे दत्ताभाऊ जांबले, केतन भापकर, किरण गायकवाड, सोमनाथ मोरे, विकास गायकवाड, संदीप शितोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleकोरोना विरोधातील लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच लोकसहभागही  गरजेचा — जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख 
Next articleपुणे सोलापूर हायवे वर झालेला सिनेस्टाईल दरोडा दौंड पोलिसांकडून उघड