कोरोना विरोधातील लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच लोकसहभागही  गरजेचा — जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख 

Ad 1

1
अमोल भोसले,उरळी कांचन
 “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या योजनेअंतर्गत घरोघरी जाऊन शासकीय यंत्रणेमार्फत जिल्हातील प्रत्येक नागरीकांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. कोरोनाला कुटुंबापासून, गल्लीपासून, गावापासून कायमस्वरुपी दूर ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच, लोकप्रतिनिधी, स्वयंमसेवी संस्था व नागरीकांनी स्वंयणस्फुर्तीने पुढे येऊन, कोरोना विरोधातील लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे केले.

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या योजनेअंतर्गत जिल्हातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका हद्दीतील नागरीकांची तपासनी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान या योजनेचा शुभारंभ कुंजीरवाडी येथे मंगळवारी  सकाळी जिल्हाधिकारी देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून  करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना डॉ. देशमुख यांनी वरील आवाहन केले.