हरणाच्या पाडसाला कुत्र्या पासुन वाचवले सर्पमित्र खलिल शेख यांच्या माध्यमातून वनरक्षक यांच्या स्वाधीन

अमोल भोसले पुणे

पुरंदर तालुक्यातील पारगाव- मेमाणे गायकवाड वस्ती येथील कु.धनेश अमोल गायकवाड या मुलाने भटक्या कुत्र्यांनी हल्ला करुन पकडलेल्या भेकर जातीच्या हरणाच्या पाडसाला कुत्र्या पासुन वाचवले आणि उरुळी कांचनचे सर्पमित्र खलिल शेख याना कळवले. शेख आणि त्यांचे सहकारी कुंजीरवाडीचे सर्पमित्र रमेश हरिहर यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन त्या पाडसाची तपासणी करुन त्या परिसरातील वनरक्षक गोते आणि पुनम गायकवाड यांच्याशी संपर्क साधुन भेकराच्या पाडसास त्यांच्या स्वाधिन केले. त्या पाडसास हरणाचे कळप वावरत असलेल्या सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडुन देण्यात येईल असे वनरक्षकांनी सांगितले आणि त्या पाडसाचा जीव वाचवल्या बद्दल धनेश आणि दोन्ही प्राणि मित्रांचे आभार मानले.

Previous articleदौंड मध्ये भाजपा’चे सरकार विरोधात आंदोलन
Next articleराज्यातील १९ दिवंगत पत्रकारांना हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रध्दांजली