दौंड मध्ये भाजपा’चे सरकार विरोधात आंदोलन

सचिन आव्हाड,दौंड

दौंड तालुक्यातील चौफुला येथे आज भारतीय जनता पार्टी च्या वतीने राज्य सरकार ला मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता न आल्याने महाविकास आघाडी सरकार चा निषेध करण्यात आला . यावेळी सरकार विरोधी घोषणा बाजी उपस्थितांनी केली .

मराठा समाजाला आरक्षण … मिळालंच पाहिजे ..मराठा समाजाला आरक्षण .. मिळालंच पाहिजे

कोण म्हणतंय देणार नाही ,घेतल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचे अशी घोषणा बाजी यावेळी करण्यात आली .

यावेळी भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे , राजाराम तांबे , ज्ञानेश्वर शेळके यांसह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली .

या आंदोलनावेळी भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे , भाजपा चे दौंड तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ताकवणे , राजाराम तांबे , गणेश आखाडे संघटक, नामदेव बारवकर, तानाजी दिवेकर सरचिटणीस भाजपा पुणे जिल्हा, वसंत साळुंखे , बापूराव भागवत दादा भंडलकर, ज्ञानेश्वर शेळके, यांसह मान्यवर उपस्थित होते.

या आंदोलनावेळी यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांसह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी , कर्मचारी हजर होते .

Previous articleप्रहार जनशक्ती पक्षाच्या दौंड तालुकाध्यक्षपदी रमेश शितोळे यांची निवड
Next articleहरणाच्या पाडसाला कुत्र्या पासुन वाचवले सर्पमित्र खलिल शेख यांच्या माध्यमातून वनरक्षक यांच्या स्वाधीन