राज्यातील १९ दिवंगत पत्रकारांना हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रध्दांजली

अमोल भोसले, उरुळी कांचन

सर्वसामान्य लोकांचे प्रश्न व समस्या सोडविणारे पत्रकार समाजसेवेचे कार्य करीत आहेत. मात्र सध्या कोरोनारुपी राक्षसाने सर्वंच क्षेत्राना जबरदस्त तडाखा दिलेला असताना अनेक पत्रकारांचे जीव शासनाच्या असुविधेमुळे गेले आहेत, शासनाने पत्रकारांना प्राधान्याने सर्वोतोपरी मदत करावी असे आवाहन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक तथा हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल जगताप यांनी शोकसभेत व्यक्त केले.

हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस – माथेरानचे पत्रकार संतोष पवार आणि राज्यातील अन्य १९ दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली सभेचे आयोजन प्रसंगी जगताप बोलत होते. मराठी पत्रकार परिषदेच्या झालेल्या झुम बैठकीत दिवंगत पत्रकारांना श्रद्धाजंली वाहण्याच्या निर्णय घेण्यात आला असल्याने. हवेली तालुका पत्रकार संघाने सोशल डिस्टनशिंगचे पथ्य पाळत श्रद्धांजली वाहिली. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या सुचनेनुसार व मराठी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक , कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुका पत्रकार संघाने श्रद्धाजंली सभेचे आयोजन केले होते.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्य प्रतिनिधी प्रभाकर क्षीरसागर, तालुका उपाध्यक्ष सुखदेव भोरडे,जेष्ठ पत्रकार राजेंद्र काळभोर, जिल्ह्याचे माजी कोषाध्यक्ष गणेश सातव, जिल्ह्याचे माजी कार्यकारिणी सदस्य संदिप बोडके, जितेंद्र आव्हाळे, भाऊसाहेब महाडिक, जयदिप जाधव, चंद्रकांत दुंडे, सचिन सुंबे, धनराज साळुंखे, विजय काळभोर, राजेश धिवार, राजकुमार काळभोर, सचिन माथेफोड, गायत्री भंडारी, रियाज शेख या पत्रकारांसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने कोरोना रुग्णांवर उपचार करणारे थेऊर येथील डॉ. मोहन वाघ यांचे कोरोना आजार व त्यावरील उपचार या संदर्भातील प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केले होते. त्यांनी उपस्थित पत्रकारांना सोप्या भाषेत कोरनाच्या संदर्भात विस्तृत माहिती देत काही व्यायामाचे प्रकार प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले आणि पत्रकारांनी या बाबी स्वयंशिस्तीने पाळाव्यात असे आवाहन करुन स्वतः सुदृढ राहून नंतर आपण इतरांना त्या प्रवाहात आणून समाज प्रबोधन करावे अशी विनंती केली.

Previous articleहरणाच्या पाडसाला कुत्र्या पासुन वाचवले सर्पमित्र खलिल शेख यांच्या माध्यमातून वनरक्षक यांच्या स्वाधीन
Next articleसंतोष पवार यांना कोरोना योद्धा सन्मान प्राप्त