आदीनाथ थोरात हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाचे पंख देणारे ऋषितुल्य

Ad 1

दिनेश पवार,दौंड 

हजारों विद्यार्थ्यांना ज्ञानाचे पंख देऊन यशस्वी होण्यासाठी वाट दाखवणारे,महाराष्ट्रातील शैक्षणिक संघ,महामंडळाच्या कार्यकारणीत महत्वाच्या पदावरती काम करून शिक्षण क्षेत्रातील समस्या विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानाने,तणाने,मनाने उभारी देणारे व्यक्तिमत्त्व देऊळगाव राजे येथील सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदिनाथ महादेव थोरात हे नुकतेच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले, ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई याचे सचिव,पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे-उपाध्यक्ष आशा पदावरती काम करत आहेत.

आदीनाथ थोरात सर काम करत असताना  विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या समस्या, शिक्षणक्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. सन 1988 साली कै. नानासाहेब पवार यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामीण भागात उजाड माळरानावरती शिक्षणाच्या बीजरूपी सिद्धेश्वर शिक्षण संस्था सुरू केली तेंव्हापासून आदिनाथ थोरात यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडवण्यासाठी सुरुवात केली,या हुशार,संयमी,शांत व्यक्तिमत्वाने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाचे पंख दिले,या पंखाच्या जोरावरती असंख्य विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत, यातील एक उदाहरण म्हणजे मी स्वतः(पत्रकार)सरांचाच विद्यार्थी आहे, सरांनी व मार्गदर्शक शिक्षकांनी शालेय जीवनात माझ्यातील कौशल्य ओळखून मला संधी दिली,व्यासपीठ निर्माण करून दिले नि म्हणूनच भविष्यात राज्यस्तरीय वक्तृत्वाचा विजेता ठरलो,माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी सरांच्या मार्गदर्शनातून घडले आहेत, असे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व सेवानिवृत्त झाले, खरोखरच सिद्धेश्वर शिक्षण संस्थेने व या शाळेचे मुख्याध्यापक थोरात सरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक नवी ओळख निर्माण करून दिली हे मात्र नक्की.