लोकमंगल पतसंस्था समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचणार- आमदार सुभाष देशमुख

अमोल भोसले,उरुळी कांचन

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूरची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा लोकमंगल मल्टीस्टेट शेळगी येथे पार पडली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीची वार्षिक सर्वसाधारण सभा शासकीय नियमांचे पालन करुन मर्यादित सभासद व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी लोकमंगल समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देशमुख , पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली, व्हा. चेअरमन निर्मला कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव पाटील, सरव्यवस्थापिका अलका देवडकर, संचालक हरिश्चंद्र गवळी, मनीष भैय्या देशमुख, शहाजी साठे, समाधान पाटील, फैय्याज मुलानी, युवराज गायकवाड, सिद्राम देवकुळे, रेवनप्पा व्हनमाणे, भिमाशंकर कलशेट्टी, सरोजनी टीपे पतसंस्थेचे शासकीय लेखा परीक्षक दीपक दरगड, कायदेशीर सल्लागार धनंजय केकडे, वकील साहेब, अविनाश महागावकर, शिवाजी दादा पाटील तसेच सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सभासदांना १४ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. उपस्थित सभासदांनी संस्था वाढीसाठी काही सूचना केल्या तसेच संस्थेचे शासकीय लेखापरीक्षक दिपकजी दरगड यांनी त्यांच्या भाषणात सध्याच्या कोरोना काळात देखील संस्थेची सांपत्तिक वाढ उल्लेखनीय असल्याचे सांगून कौतुक केले व दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संस्थेस ऑडिट वर्ग “अ” मिळाल्याचे सांगितले. या काळात देखील सांपत्तिक स्थितीमध्ये खूप चांगली प्रगती आहे ते केवळ सभासदांनी दाखवलेला विश्वास व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे चीज आहे असे सांगितले. त्या नंतर लोकमंगल समूहाचे संस्थापक मा बापूसाहेब यांनी त्यांच्या भाषणामध्ये उपस्थित मान्यवर, संचालक मंडळ, सभासद बंधू – भगिनी, पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी वृंद यांना मार्गदर्शन केले त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक लोकमंगल समूहाशी जोडला गेला पाहिजे व पुढील काळात लोकमंगल पतसंस्था प्रत्येक गावागावात पोहोचली पाहिजे समाजातील प्रत्येक घटकाने छोट्या-मोठ्या व्यावसायिकाने या संधीचा लाभ करुन घ्यावा असे आवाहन केले.

पतसंस्थेने कोरोना प्रतिबंधात्मक लॉकडाऊन काळामध्ये “व्यवसाय तुमचा आधार आमचा” या पार्श्वभूमीवर जवळपास समाजातील प्रत्येक घटकातील ४०० व्यवसायिकांना कर्ज स्वरुपात मदतीचा हात देऊन खऱ्या अर्थाने सहकाराची भूमिका सार्थक केली.
प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन गुरणा काका तेली यांनी व अहवाल वाचन सरव्यवस्थापीका अलका देवडकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश लोंढे यांनी तर आभार प्रदर्शन संचालक युवराज नाना गायकवाड यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Previous articleमंगळवार पेठेतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाची दुर्दशा
Next articleआदीनाथ थोरात हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाचे पंख देणारे ऋषितुल्य