मंगळवार पेठेतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाची दुर्दशा

पुणे (अमोल भोसले)-माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद कृष्णा शेट्टी यांनी स्वतः आंबेडकर भवनाला भेट दिली असता त्यांना पुढील गोष्टी निदर्शनास आल्या.आंबेडकर भवनातील पार्किंग मधील दोन खोल्यांमध्ये अडगळीचे सामान पडलेले होते.भवनामध्ये एक बंद हातगाडी आहे. भवनातील पायऱ्यांवर कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे.आंबेडकर भवनाचा आजूबाजूच्या परिसरात हिरवळ वाढलेली आहे तसेच अनेक ठिकाणी राडारोडा पडलेला आहे.

भवनाची ही दुर्दशा पाहिल्यानंतर आम्ही याच उद्देशाने हे चळवळीचे केंद्र उभे केले होते का ? हे होणे बाकी होते का? अशी परिस्थिती का झाली? तेथे सफाई ठेकेदार का नेमले नाहीत ? असे अनेक प्रश्न माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री सदानंद कृष्णा शेट्टी यांनी उपस्थित केले.

तसेच महानगरपालिकेच्या संबंधित विभागाची बैठक घेऊन येथील डागडुजी बाबतीत लक्ष घालण्यास सुचना करणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

Previous articleजुन्नर तालुक्यात ९२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
Next articleलोकमंगल पतसंस्था समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचणार- आमदार सुभाष देशमुख