Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
चाकण-निसर्ग चक्रीवादळा मध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या खेड तालुक्यातील धामणे शाळेस नवीन इमारत मिळणार आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या प्रयत्नातून या शाळा इमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे.या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले.
काही दिवसां पूर्वी निसर्ग चक्रीवादळा मध्ये शाळेचे संपूर्ण छत उडून दुर्घटना घडली होती त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील व जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी शाळेला भेट दिली होती. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी गावकऱ्यांना शब्द दिला होता ज्ञानमंदिराचे काम लवकरात लवकर भव्यदिव्य स्वरूपाचे करू त्याच प्रमाणे दिलेला शब्द पाळत नूतन इमारतीच्या शाळेचे कामाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

या समारंभास पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती आरगडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश राळे,जयसिंग दरेकर,समीर राळे, कैलास बोऱ्हाडे,अंकुशराव कोळेकर,रोहिदास रामाने,सुरेश कानडे,बाळासाहेब वाजे, मिलिंद येवला, शरद बाणखेले, धामणे गावचे सरपंच महेंद्र कोळेकर, उपसरपंच सीमा कोळेकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संगीता कोळेकर,उपाध्यक्ष संभाजी गिऱ्हे, बाबाजी सातपुते,सत्यवान भोकसे, चेअरमन शांताराम कोळेकर,काळूराम गिऱ्हे, माऊली बारवेकर,संजय कोळेकर, नितीन रायकर, बारकू सातपुते,माऊली कोळेकर, संदीप कोळेकर,किरण कोळेकर, ग्रामविकास अधिकारी एल.बी बांबळे,मुख्याध्यापक धर्मराज पवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पाईट विद्यालयात दहावीला पहिली आलेली पूजा कोळेकर, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात बारावीला पहिला आलेला अक्षय कोळेकर, महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर मध्ये दहावीला पहिली आलेली श्रद्धा कोळेकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी सरपंच समीर कोळेकर यांनी केले
Download WordPress Themes Nulled and plugins.