मंगळवार पेठेत सोलर लाईट बसविल्यामुळे लाईट बिलातुन नागरिकांची सुटका

Ad 1

अमोल भोसले, पुणे

आत्तापर्यंत प्रशासनास सहकार्य केले तसेच येणारे पुढील काही दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांनी स्वतःहुन काळजी घ्यावी. पुणे मंगळवार पेठ श्री अश्विनी गणेशाचे व श्री गुरुदेवदत्त महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम तसेच सदानंद नगर मधील प्राचीन महादेव मंदिराचे जीर्णोध्दार लवकरच होईल असे आश्वासन पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी केले.

शांत संयमी परखड राजकीय लोकनिष्ठ समाजनिष्ठ, राजकारणा पलिकडचे नेतृत्व पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्या विविध वाढदिवसा निमित्ताने सोशल डिस्टनशिंग ठेवून घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी शेट्टी बोलत होते. मंगळवार पेठ SRA मधील रोड मॉर्डल सदानंद नगर सोसायटीला पाण्याची मोटार / लिफ्ट यांचे महिना १ लाख ६० हजार रुपये बील येत असल्याने याठिकाणी सोलर लाईट बसविल्यामुळे वीज निर्मिती होत आहे.

येथील नागरिकांना जे लाईट बील भरावे लागणार होते त्यातून सुटका झाली. यावेळी नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी, पंकज अरगर्डे, विकास नायकुडे, मेहबूब शेख, धर्मेंद्र खोतरे, मंगेश साखरे, हर्षद काळे,इकबाल शेख, गणेश नायकुटे,कृष्णा अवघडे आदी उपस्थित होते.