पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर मळद हद्दीत चोरट्यांनी 30 लाख रुपये लुटले

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद (ता. दौंड)हद्दीत शनिवार दि. 29 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता टेम्पोचालक खाली उतरला असता दोन काळ्या रंगाच्या पल्सरवरती आलेल्या अज्ञात चोरट्यांनी 30 लाख रुपये असलेली बॅग चोरून नेली,सदर रक्कम ही पोल्ट्री फार्म ची असल्याची माहिती मिळत आहे.

हा टेम्पो पुण्यकडून सोलापूर कडे चालला होता,या संदर्भात दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तत्काळ सुरक्षायंत्रणेद्वारे त्वरित मेसेज देऊन मळद हद्दीतील वृंदावन हॉटेल जवळ घडलेल्या घटनेची माहिती परिसरातील पोलीस पाटील व नागरिकांना दिली

या माहिती मुळे परिसरातील ग्रामसुरक्षा दल लगेचबोरिबेल, रावणगाव ,भागवतवस्ती,देऊळगाव राजे येथील पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दल सतर्क झाले.तरी याबाबत काही माहिती मिळाल्यास दौंड पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामसूरक्षा यंत्रणेद्वारे माहिती देऊन दौंड पोलिसांनी त्वरित तपास करण्यास सुरुवात केली आहे.