माहिती अधिकार कार्यकर्ते वारघडे यांना बंदूकधारी अंगरक्षक

Ad 1

शिक्रापुर / प्रतिनिधी 

बकोरी ता. हवेली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती सेवा समितीच्या माध्यमातून राज्यभर भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम करणारे चंद्रकांत वारघडे यांना पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने 2 शस्त्र अंगरक्षक तैनात करण्यात आले आहे . वारघडे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून  राज्यभरात अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळले आहेत. तर पुणे जिल्ह्यात देखील माहिती सेवा समितीच्या माध्यमातून त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनचे आणि वृक्षारोपणाची जोरदार काम सुरू  आहे.तर पुणे जिल्हातील अनेक अधिकाऱ्यांची ,तसेच कामाची वारघडे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मागवत भष्टाचार उघड केला आहे.

तर गेल्या काही  दिवसापूर्वी चंद्रकांत वारघडे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक देखील करण्यात आली होती तर काही लोकांकडून त्यांना धमक्या  देखील आल्याचे प्रकार समोर आले  होते .यामुळे त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे जीवितास धोका असल्याने संरक्षण देण्याची मागणी केली होती याची दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार चंद्रकांत वारघडे यांना दोन शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.