राष्ट्रवादीच्या फ्रंटल व सेलच्या राज्यप्रमुखांच्या मॅरेथॉन आढावा बैठकीचा दुसरा टप्पा पार…पक्षाच्या विविध उपक्रमांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आढावा

अमोल भोसले,उरुळी कांचन – प्रतिनिधी

पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत फ्रंटल व सेल संघटनांच्या राज्यप्रमुखांच्या सुरू असलेल्या मॅरेथॉन आढावा बैठकीचा दुसरा टप्पा आज पार पडला.
चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक सेल, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल, ओबीसी सेल, सोशल मीडिया सेल या विभागांच्या बैठका झाल्या. या विभागांकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला.
कार्यकर्त्यांचे विचार वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रवादी अभिप्राय अभियानाची माहिती व संघटन बांधणीसाठी केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा देखील जयंत पाटील यांनी यावेळी घेतला.

यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चिटणीस संजय बोरगे हे पदाधिकारी उपस्थित होते.
चित्रपट, कला, साहित्य व सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष नंदकुमार बंड, राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादल प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, उपाध्यक्ष जानबा म्हस्के, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, प्रदेश सोशल मीडिया प्रभारी अदिती नलावडे यांनी या बैठकांमध्ये सादरीकरण केले.

Previous articleदौंड ग्रामीण भागात आज कोरोना चे 12 रुग्ण
Next articleजुन्नर तालुक्यात आजपर्यंत १०७१ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ६२२ रुग्ण उपचार घेऊन परतले घरी