जुन्नर तालुक्यात आजपर्यंत १०७१ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ६२२ रुग्ण उपचार घेऊन परतले घरी

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यात आज ७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आजपर्यंत आढळलेल्या एकूण १०७१ रुग्णांपैकी ६२२ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.
नारायणगाव व ओतूर येथे आज प्रत्येकी ९ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून येणेरे येथे ८ तर पिंपरी पेंढार येथे ६ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

वडज, जुन्नर व आळे येथे प्रत्येकी ५ , खिलारवाडी येथे येथे ४, काळवाडी, डिंगोरे व निमगाव सावा येथे प्रत्येकी तीन, आळेफाटा येथे दोन, तर मांजरवाडी, वडगाव आनंद, धोलवड, काटेडे, ओझर, राजुरी, शिरोली बुद्रुक, बोरी बुद्रुक, पिंपळवंडी, उंब्रज, येडगाव मध्ये आज प्रत्येकी १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.
आज कोरोनामुळे आळे व डिंगोरे येथील प्रत्येकी एक अशा दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
वाढत्या कोरोणा रुग्णांमुळे जुन्नर तालुक्यांमध्ये निश्चितपणे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे गरजेचे असून योग्य कारणासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसात सुमारे १५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जुन्नर तालुक्यात निष्पन्न झाल्यामुळे व एक हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात आज पर्यंत १०७३ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यातील सुमारे ६२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ४०५ अँक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण ४४ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उदय गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

Previous articleराष्ट्रवादीच्या फ्रंटल व सेलच्या राज्यप्रमुखांच्या मॅरेथॉन आढावा बैठकीचा दुसरा टप्पा पार…पक्षाच्या विविध उपक्रमांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आढावा
Next articleजुन्नर तालुक्याचे आमदार अतुल वल्लभशेठ बेनके कोरोना पॉझिटिव्ह