दौंड ग्रामीण भागात आज कोरोना चे 12 रुग्ण

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात आज दिनांक 28 ऑगस्ट 2020 रोजी एकूण 12 रुग्ण पॉजीटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली, एकूण 40 व्यक्तींचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले होते,त्यातील 12 जण पॉजीटिव्ह आले आहेत,

पाटस-7,रावणगावं-3,केडगाव-1,कुरकुंभ-1, येथील रुग्ण आहेत,हे सर्व 12 ते 74 वयोगटातील आहेत,हे रिपोर्ट स्वामीं चिंचोली येथील कोविड सेंटर येथील आहेत.तालुक्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी सतर्कता पाळणे गरजेचे आहे, शासनाने दिलेले नियम पाळून, मास्क, सॅनिटायजर याचा वापर करून सोशल डिस्टन्स पाळल्यास कोरोना परिस्थिती आटोक्यात येईल,तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी केले आहे.