आदर्श मित्र मंडळाच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान

दिनेश पवार-दौंड (प्रतिनिधी)
आदर्श मित्र मंडळ होलार नगर दौंड यांच्यावतीने समाजातील सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना काळात सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या सामाजिक स्वयंसेवी संस्था चा व आदर्श व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला, संपूर्ण जग कोरोना सारख्या प्रादुर्भावात आहे, सगळीकडे लॉकडाऊन परिस्थिती असताना,या काळात जनतेला अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या व्यक्तीनी,सामाजिक संस्थांनी केलेले कार्य आदर्श घेण्यासारखे आहे, म्हणून आशा कर्तृत्वाचा सन्मान आदर्श मित्र मंडळ होलार नगर दौंड च्या वतीने करण्यात आला, इतर अनावश्यक खर्च टाळून या मंडळाने केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, परिसरातून या मंडळातील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे व त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे
Previous articleकुख्यात आरोपीच्या दौंड पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Next articleदौंड ग्रामीण भागात आज कोरोना चे 12 रुग्ण