मुलनिवासी शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत सलवदे व शंकर घोडे यांची जिल्हा महासचिव पदावर निवड

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

मुलनिवासी शिक्षक संघ या सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत सलवदे व जिल्हा महासचिवपदी शंकर घोडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गौतम कांबळे संस्थापक अध्यक्ष मूलनिवासी शिक्षक संघ यांनी दिली.

सलवदे यांचे सामाजिक क्षेत्रातील काम पाहून ही निवड करण्यात आली आहे, या निवडीमुळे शिक्षकांच्या अडचणी,प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी सांगितले.मूलनिवासी शिक्षक संघ ही सामाजिक संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत .समाजातील वंचित घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे .

सलवदे सर व घोडे सर यांच्या निवडीमुळे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सभासद व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .समाजातील गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर बोलताना सलवदे व घोडे यांनी सांगितले .

Previous articleउत्कृष्ट काम करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार- अफसर शेख
Next articleवाट चुकलेल्या ६५ वर्षीच्या आजींना किरण कोळेकर या तरूणाच्या सतर्कतेमुळे मिळाले नातेवाईक