उत्कृष्ट काम करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार- अफसर शेख

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासून जे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करतात,त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानवाधिकार सुरक्षा संघाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार असल्याचे मानवाधिकार सुरक्षा संघाचे प्रदेशाध्यक्ष अफसर शेख यांनी सांगितले.

राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाने अल्प वेळात संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हयात अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सक्रिय टिमची निर्मिती केली आहे. जात, पक्ष, धर्म बाजूला ठेऊन सर्वच पदाधिकारी व महिला संघटनानी यशस्वीरित्या प्रत्येक विभागात धाडसाने काम केले आहे. याचाच आढावा घेण्यासाठी मंगळवार दि. २५ ऑगस्ट रोजी ४ वा. संघातील प्रदेश प्रमुख पुरूष, महिला कमेटी प्रदेश कमिटी निरिक्षक विभाग प्रमुख महत्वाच्या प्रमुखांची कॉन्फरंसिंग कॉलद्वारे बैठक घेऊन राज्यातील आढाव्यासह अनेक महत्वाच्या सूचनाही देण्यात आल्या. ज्या विभागात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना राज्यस्तरिय समाजभूषण पुरस्काराने लवकरच गौरविण्यात येणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष अफसर शेख यांनी केली.

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघातील राज्यातील सर्व प्रमुख पुरूष पदाधिकारी, महिला कमेटी पदाधिकारी, प्रदेश निरीक्षक, विभाग प्रमुखांची अत्यंत तातडीची कॉन्फरेन्स कॉलद्वारे मिटिंग घेण्यात आली. या बैठकित प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेऊन पुढील दिशा ठसवण्यात आली. राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघात काम करीत असताना पक्ष, जात, धर्म बाजूला ठेऊन सर्वच क्षत्रातील तळागाळातील नागरिकांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना कशा स्वरूपाचा न्याय मिळवून दिला जाऊ शकतो. यावर भर देण्यासाठी सूचना देण्यात आल्या. ज्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र मिळालेले नाही, अशा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचा फॉर्म भरून देणे अत्यंत आवश्यक आहे. जो पदाधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात पदाचा गैरवापर करील त्या पदाधिकाऱ्याला संघातून तात्काळ बडतर्फ करण्यात येणार आहे. राज्यात महिलांचे संघटन कमी असल्यामुळे माहिला पदाधिकाऱ्यांनी सक्रिय होऊन महिलांचे संघटन वाढवण्याचे आदेश देण्यात आले. आपल्या संघाचा अपप्रचार व अफवा करणाऱ्याकडे लक्ष न देता आपल्या कार्यक्षेत्रात जोमाने काम सुरू ठेवावे असे आवाहनही प्रदेशाध्यक्षांच्या वतीने बैठकित करण्यात आले.

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या ज्या विभागात माहिती पुस्तिकेच्या नोंदी
झालेल्या नाहीत, त्या नोंदी दोन दिवसात पुर्ण करून घ्याव्यात असे सर्वांना सांगून नवनिर्वाचीत पदाधिकारी व माता भगिनी पदाधिकाऱ्यांचा परिचय करून देण्यात आला. लवकरच प्रदेशाध्यक्षासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र दौरा होणार असल्याचेही सांगण्यात आले. संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रत्येक बैठकिस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. सूचना देऊनही जे पदाधिकारी बैठकिस उपस्थित रहाणार नाहीत, अशा पदाधिकाऱ्यांना संघटनेत काम करण्याची संधी दिली जाणार नाही. यासह अनेक महत्वाचे मुद्दे प्रदेशाध्यक्षांनी बैठकित उपस्थित केले.

या कॉन्फरंस बैठकिस प्रदेशाध्यक्ष अफसर शेख, महाराष्ट्र महासचिव सुभाष भोसले, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बापूराव कुलकर्णी, कायदेविषयक सल्लागार अॅड. विश्वास देशपांडे, अॅड लक्ष्मण बेडेकर,महाराष्ट्र राज्य सहसचिव अरविंद पत्की, प्रदेश निरीक्षक संजय सुपेकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष दिपक जाधव,, सुरेश संकपाळ,स दाशिव रणदिवे, उमेश शिंदे, विवेक कुंभेजकर ,महिला म.रा. प्रदेश कार्याध्यक्षा सौ. श्रध्दा गिरी, म.रा. महिला सचिव नमिता थिटे, म.रा. महिला संपर्क प्रमुख प्रिती ठाकरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची आवर्जुन उपस्थिती होती. या मिटींगचा सर्व वृत्तांत व माहिती संजय गोविंदराव सुपेकर, प्रदेश निरिक्षक, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ यांनी दिली.

Previous articleअखिल भारतीय वारकरी मंडळाच्या अध्यात्मिक उन्नती विभागाच्या सदस्यपदी ह.भ.प. सौ. सुप्रियाताई साठे ठाकुर यांची निवड
Next articleमुलनिवासी शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत सलवदे व शंकर घोडे यांची जिल्हा महासचिव पदावर निवड