अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या अध्यात्मिक उन्नती विभागाच्या सदस्यपदी ह.भ.प. सौ. सुप्रियाताई साठे ठाकुर यांची निवड

चाकण– ह.भ.प. सौ.सुप्रियाताई साठे ठाकुर यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी महिला अध्यात्मिक उन्नती विभाग सदस्य पदावर राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्याकडुन निवड करण्यात आली. ही संघटना संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व जोपासना करण्याचे कार्य करीत आहे.

ह.भ.प. सौ. सुप्रियाताई साठे ठाकुर या उच्चशिक्षित असुन त्यांनी Bsc in microbiology आणि MBA in HR हे पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत युवा किर्तनकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. वयाच्या 8 व्या वर्षापासून गेली 20 वर्षे त्यांनी महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक,या राज्यात 5000हुन अधिक किर्तने केली आहेत, त्याचप्रमाणे गेली 12 वर्षे त्या श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात स्वतंत्र महिलांची दिंडी श्रीसंत जिजाबाई महिला प्रासादिक दिंडी चालवतात. त्यात दरवर्षी 500 हून अधिक महिलांचा समावेश असतो. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे.

Previous articleअखिल भारतीय वारकरी मंडळाच्या अध्यात्मिक उन्नती विभागाच्या सदस्यपदी ह.भ.प. सौ. सुप्रियाताई साठे ठाकुर यांची निवड
Next articleउत्कृष्ट काम करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार- अफसर शेख