वाट चुकलेल्या ६५ वर्षीच्या आजींना किरण कोळेकर या तरूणाच्या सतर्कतेमुळे मिळाले नातेवाईक

राजगुरुनगर – पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका वाट चुकलेल्या ६५ वर्षीय आजींना खेड तालुक्यातील पश्चिम भामखोऱ्यातील धामणे गावच्या किरण कोळेकर या तरुणाच्या सतर्कतेमुळे आपले नातेवाईक मिळाले. किरण कोळेकर यांनी त्यांची व नातेवाइकांची सह्रद भेट घालून दिली.

छायाचित्र-आजींना मदत करणारा किरण कोळेकर हा युवक

मिळालेल्या माहितीनुसार दि. (२४ ) रोजी किरण कोळेकर धामणे येथील वस्तीवरून गावात जात असताना सायंकाळी सहा वाजता एका झाडाखाली बसलेल्या अवस्थेत अनोळखी आजींना पाहिले, कोळेकर यांनी तात्काळ “आजींना कोठून आल्या कोठे जायचे आहे असे विचारले असता असे त्यांनी “मला पाबळचा रस्ता दाखवा…” असे म्हटले. त्यानंतर कोळेकर यांच्या लक्षात आले कि सदर आजी रस्ता चुकलेल्या आहेत, त्यांनी अधिक चौकशी करता माहेर वाकळवाडी गावाचे नाव सांगितल्याने कोळेकर यांच्या  लक्षात आले कि आपल्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्यध्यापक धर्मराज पवळे वाकळवाडी  येथील आहेत. त्यांनी तातडीने पवळे गुरुजींना व्हाॅटसअप द्वारे फोटो पाठवून आजी ओळखीची आहे का चौकशी करण्यास सांगितले, घटनेचे गांभीर्य ओळखून धर्मराज पवळे यांनी फक्त वाकळवाडी गावच्या ‘वाळकेश्वर युवा प्रतिष्ठान’ या व्हाॅटस्अप गुपवर फोटो व माहिती टाकल्याने आजींची ओळख पटली.

दरम्यान किरण कोळेकर यांनी खेड तालुक्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असताना देखील आपल्या स्वत:च्या चारचाकी गाडीमध्ये दोंदे येथे दिलेल्या आजींच्या मुलीकडे रात्री साडेनऊ वाजता सुखरुप पोहचवले. आईला भेटल्यानंतर मुलीने समाधान व्यक्त केले. आजींना दोंदे येथील मुलीकडे घेऊन जाण्यासाठी रात्रीची वेळ असल्याने गावातील सत्यवान भोकसे, दिपक करंडे यांना संपर्क करून मदतीला बोलवले. त्यांची याकामी मोलाची मदत झाल्याचे कोळेकर यांनी सांगितले.

आजकाल तरूण वर्ग व्हाॅटस्अप व फेसबुकचा अती वापर करत असतानाच त्याचा विधायक कामांसाठी उपयोग करावा असे किरण कोळेकर यांनी सांगितले.

एकूणच भामखोर्‍यातील तरुणांमध्ये आजही माणुसकीचा झरा वाहतो आहे, किरण कोळेकरांचे संवेदनशील काम युवा पिढीसाठी आदर्शवत आहे.

Previous articleमुलनिवासी शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत सलवदे व शंकर घोडे यांची जिल्हा महासचिव पदावर निवड
Next articleवाट चुकलेल्या ६५ वर्षीय आजींना किरण कोळेकर या तरूणाच्या सतर्कतेमुळे मिळाले नातेवाईक