कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत “मेरी माटी ,मेरा देश” संकल्प नशा मुक्ती अभियान निबंध स्पर्धा

श्रावणी कामत

कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कामशेत येथे आजादी का अमृत महोत्सव मेरी माटी मेरा देश व मा.श्री अंकित गोयल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनेतून व मा.श्री सत्य साई कार्तिक (सहा. पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग) यांच्या संकल्पनेतून “संकल्प नशामुक्ती अभियान” या दोन्ही उपक्रमा अंतर्गत कामशेत पोलीस स्टेशनचे वतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कॉलेजमधील 12 बारावीचे वर्गातील (आर्ट्स,कॉमर्स, सायन्स) मुलांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला.सदर निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण, गौरव चिन्ह, प्रमाणपत्र वाटप समारंभ आज रोजी घेण्यात आला. युवकांना नशेचे दुष्परिणाम बाबत जनजागृती करून आपला देश नशा मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रभावना राष्ट्रप्रेम वाढीस लागावे व त्यांनी नशा मुक्त निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करून देशसेवेसाठी व समाजसेवेसाठी योगदान द्यावे त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून कार्यक्रम आयोजन मार्गदर्शन केले. सदर वेळी कॉलेजमधील विद्यार्थी ,माध्यमिक विद्यालयातील शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी, प्राचार्य व कॉलेजमधील शिक्षक, पोलीस स्टाफ उपस्थित होता

Previous articleनिधन वार्ता – कैलास डहाळे यांचे दुःखद निधन
Next article“स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार 2023”