“स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार 2023”

श्रावणी कामत

लोणावळ्यातील जागतिक कीर्ती असलेल्या कैवल्यधाम योग संस्थेतर्फे यंदाचा ” स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार 2023″ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्मानीय श्री रमेश बैस यांच्या शुभ हस्ते सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी स्वामी रितवन भारती, स्वामी रामा साधक ग्राम, ऋषिकेश आणि पद्मश्री डॉ. डी. आर. कार्तिकेयन, माजी CBI Director या दोन मान्यवरांना प्रदान करण्यात आला.

सर्वप्रथम राज्यपालांनी संस्थेच्या सान्दीपनी ग्रंथालय, दार्शनिक अनुसंधान विभाग आणि शास्त्रीय अनुसंधान विभागांस भेटी दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात, राष्ट्रीय गीत, महाराष्ट्र गीत आणि शांती पाठाने करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्मानीय श्री रमेश बैस आणि कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांच्या शुभ हस्ते वैदिक मंत्राने दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर श्री सुबोध तिवारी यांनी सन्मानीय राज्यपाल यांचे शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन स्वागत केले. या नंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्मानीय श्री रमेश बैस यांच्या शुभ हस्ते स्वामी रितवन भारती, स्वामी रामा साधक ग्राम, ऋषिकेश आणि पद्मश्री डॉ. डी. आर. कार्तिकेयन, CBI चे माजी संचालक या दोन मान्यवरांना ” स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार 2023″ प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त स्वामी रितवन भारती आणि पद्मश्री डॉ. डी. आर. कार्तिकेयन यांनी आपली मनोगते व्यक्त केली

शेवटी राज्यपालांचे भाषण झाले. त्यांनी कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने करण्यात आली

कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी पी. दिव्या आणि श्री रामदास यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. रणजीत सिंग भोगल यांनी केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी केले होते.

कैवल्यधाम “स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार 2023 ” : स्वास्थ्य आणि आरोग्य- कल्याण क्षेत्रातील असाधारण जीवन-कार्यास समर्पित

लोणावळा, २८ ऑगस्ट २०२३: सुदृढ शरीर आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी सतत कार्यान्वित असलेली – योगसंस्था, कैवल्यधाम, अशी संस्था जी योग आणि सर्वांगीण आरोग्यासाठी एक प्रसिद्ध केंद्र आहे, ह्या संस्थेच्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात संस्थेने स्वास्थ्य आणि आरोग्य-कल्याण क्षेत्रातील दोन मान्यवर व्यक्तींचा त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी जाहीर सत्कार केला. २८ ऑगस्ट २०२३ रोजी कैवल्यधामच्या भव्य सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमास श्री. रमेश बैस, महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कैवल्यधाम हि संस्था योग ज्ञानाचा दिवा असून योगाभ्यासाद्वारे जनमानसाच्या आरोग्य- कल्याणाचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे. अशाच सर्वांगीण आरोग्य साधू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी गेली अनेक दशके हि संस्था मार्गदर्शक ठरली आहे. ज्यांनी आपले जीवन, आरोग्य, निरोगीपणा आणि आध्यात्मिक वाढीसाठी समर्पित केले आहे अशा व्यक्तींचे कौतुक करण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा संस्थेने सातत्याने प्रयत्न केला आहे. अशाच दोन असाधारण व्यक्तींना कैवल्यधाम स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने हा पुरस्कार सोहळा या वचनबद्धतेचा पुरावा ठरला.

पुरस्कारप्राप्त, पद्मश्री डॉ. डी. आर. कार्तिकेयन हे सी.बी.आय. चे माजी संचालक आणि मानवाधिकार आयोगाचे महासंचालक होत. गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ अनुकरणीय अशी समाज सेवा केलेले ते एक दूरदर्शी नेते आहेत. ते एक नामांकित लेखक, आंतरधर्म समरसतेचे प्रवर्तक आणि समाजातील वंचित गटाचे पुरस्कर्ते आहेत. असे जागतिक ख्याती प्राप्त, ज्यांनी प्रतिष्ठित “स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार, mathcal 2023 ^ prime prime यासह अनेक पुरस्कार मिळविले आहेत. एकूणच, , डॉ. कार्तिकेयन यांचे जीवन समर्पण, करुणा आणि समाजोन्मुख सेवाभाव दर्शवते.

पुरस्कारप्राप्त, स्वामी रितवन भारती vec vec 6 स्वामी राम साधक ग्राम, ऋषिकेशचे आश्रमप्रमुख आहेत. ते यौगिक ज्ञान आणि ध्यानाचे दीपस्तंभ असून, त्यांना “स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार, २०२३” ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या जीवनाचा ३० वर्षांहून अधिक काळ भारत देशाच्या तत्वज्ञानाच्या शिकवणींचा प्रचार व प्रसार करण्यासाठी समर्पित केला आहे. मार्गदर्शनपर ध्यान घडवून आणण्यात त्यांनी प्रगल्भ प्रभुत्व मिळविले आहे आणि ह्या कार्याद्वारे ते गंगेसारख्या पवित्रतेचा सर्वत्र प्रसार करीत आले आहेत. स्वामी राम आणि स्वामी वेद भारती यांचे ते थेट शिष्य असून वैदिक परंपरांना मूर्त रूप देत ते आध्यात्मिक आणि आधुनिक जगाला अगदी सहजगत्या जोडतात.

स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार प्रदान समारंभात बोलताना महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस म्हणाले, “कैवल्यधाम सारख्या संस्थेने आरोग्य, निरोगीपणा आणि आध्यात्मिक सुसंवाद वाढविण्यात आघाडीवर असलेल्या व्यक्तींचा सन्मान करणे ही एक आनंददायी बाब आहे. ” या पुरस्कार विजेत्यांनी असाधारण समर्पण आणि मानवाच्या कल्याणार्थ आपले जीवन खर्ची घातले असून सामाजिक उत्थानासाठी महनीय योगदान दिले आहे. प्रत्येक व्यक्तीने निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अशा व्यक्तींचे अनुकरण केले पाहिजे.”

कैवल्यधामचे मानद सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे मनापासून कौतुक व्यक्त केले, ते म्हणाले, “कैवल्यधाममध्ये, आमचे ध्येय नेहमीच सर्वांगीण कल्याणाच्या तत्त्वांचा प्रसार करणे हे आहे आणि ज्या व्यक्तींनी ह्या तत्वज्ञानाचा त्यांच्या जीवनात अवलंब केलेला आहे अशा व्यक्तींचा सन्मान करताना मला खूप आनंद होत आहे. पुरस्कृत व्यक्तींनी केवळ आपापल्या क्षेत्रातच उत्कृष्ट कामगिरी केलेली नाही तर समाजाच्या कल्याणासाठी हि त्यांनी मोठे योगदान दिले आहे. “”

सदर कार्यक्रमाला हजर असलेल्या आरोग्यसेवा, शैक्षणिक आणि अध्यात्म क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी पुरस्कृत व्यक्तींचे त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल कौतुक केले. ह्या पुरस्कार समारंभाने एकदा पुन्हा स्मरण करून दिले की उत्कृष्टता आणि सर्वांगीण कल्याणाचा प्रयत्न हा एक सामूहिक प्रयत्न आहे, ज्यासाठी व्यक्ती, संस्था आणि संपूर्ण समाजाच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.

Previous articleकामशेत पोलीस स्टेशन हद्दीत “मेरी माटी ,मेरा देश” संकल्प नशा मुक्ती अभियान निबंध स्पर्धा
Next articleउद्धव श्री” पुरस्कार सोहळ्याचे उद्या पिंपरी येथे अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण – ॲड. गौतम चाबुकस्वार