बंद असलेल्या युके इंटरमीडिएट्स कंपनीमध्ये विषारी केमिकलची गळती

कुरकुंभ : सुरेश बागल

आज पुन्हा एकदा कुरकुंभ मध्ये यूके इंटरर्मिडियटस या बंद कंपनीमध्ये विषारी १३ ड्रमची गळती होऊन धूर निघण्यास सुरुवात झाली अशी परिस्थिती निर्माण झाली होती अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेले शर्थीचे प्रयत्न आणि त्याच बरोबर अल्काईल अमाईंस, एम क्युअर कंपनीच्या सुरक्षा विभागाकडून मिळालेली योग्य वेळी साथ यांच्या मुळे आज कुरकुंभ करांना जीव मुठीत धरून पळण्याची वेळ आली नाही.

थायनील क्लोराईड सारख्या विषारी द्रव पदार्थाचे आणि ते पण तब्बल १३ ड्रम (बॅरल)कोणतीही सावधानता न बाळगता यूके इंटरर्मिडियटस या बंद कंपनीने आपल्या कंपनीच्या गेट जवळ असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवले होते ना कोणते अग्निशमन उपकरण ना सेक्युरिटी असच राम भरोसे ठेवलेला साठा आज मोठी दुर्घटनेस भर पाडण्यास कारणीभूत ठरला असता.

सदरची कंपनी गेले काही दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याची माहिती आजूबाजूच्या कामगारांनी दिली  थायलिन क्लोराईड चे तेरा ड्रम ( बॅरल)  मधील  काही ड्रममधून गळती झाल्याने अचानक परिसरात धुरच धूर पसरला  सदरचा धूर जास्त असल्याने कोणत्या कंपनी ला आग लागली,की स्फोट झाला नक्की घडलंय काय ..?अशी केविलवाणी अवस्था घटनेबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या वसाहतीतील कामगारांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली .अधिक माहिती  देताना अग्निशमन दलाचे अधिकारी मा.देशमुख साहेब यांनी सांगितले की छोट्या कंपनीने आपल्या केमिकल चा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी खबरदारीने उपाय योजना करायला हव्यात .ज्यामुळे भविष्यात एखादी भीषण परिस्थिती निर्माण होणार नाही.

या पूर्वी ही अशा बऱ्याच घटना कुरकुंभ वसाहती मध्ये घडल्या आहेत  मात्र कंपनीचे मालक यातून काहीही बोध न घेता प्रचंड उदासीन झालेले  दिसत आहेत. सदर घटने बाबत यूके इंटर्मिडियेट्स या कंपनीतून माहितीसाठी अथवा झालेल्या गंभीर घटने बाबत उपाय योजणे साठी उशिरा पर्यंत  कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही.

Previous articleभारतीय मजदूर संघाच्या महिला ट्रेकिंग करिता हिमाचल प्रदेश मध्ये रवाना
Next articleखंडाळीतील विद्यार्थी, पालकांना मिळणार ‘सारथी’च्या योजनांची माहिती