खंडाळीतील विद्यार्थी, पालकांना मिळणार ‘सारथी’च्या योजनांची माहिती

उरुळी कांचन

खंडाळी दत्तनगर (ता. माळशिरस) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांना सारथी संस्थेच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सोमवारी (दि. २१) ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता सारथी संस्थेचे प्रशिक्षक येणार आहेत. त्यामुळे खंडाळी – दत्तनगर पंचक्रोशातील विद्यार्थी व ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ९:३० वाजता उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खंडाळी – दत्तनगर ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिक माहिती अभावी अनेक शैक्षणिक योजनांपासून वंचित राहतात. सारथी संस्थेच्या अनेक योजना विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहेत. याचा फायदा गावातील विद्यार्थ्यांना व्हावा हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहावे.
– अमर रिसवडकर

Previous articleबंद असलेल्या युके इंटरमीडिएट्स कंपनीमध्ये विषारी केमिकलची गळती
Next articleमोदी सरकारवर खा. डॉ अमोल कोल्हे यांचा घणाघात