भारतीय मजदूर संघाच्या महिला ट्रेकिंग करिता हिमाचल प्रदेश मध्ये रवाना

कुरकुंभ : सुरेश बागल

हिमाचल प्रदेश मधील मनाली येथील अति उंच शिखर चंद्रभागा रेंज १३-६२६४ मिटर आणि चंद्रभागा १४-६०७८ या शिखरावर वर चढाई करण्यासाठी ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी मधील भारतीय मजदूर संघ महिला आघाडीच्या सरचिटणीस वर्षा शेळकंदे दि १९ ऑगस्ट २०२३ रोज़ी रवाना झाल्या त्या निमित्त भारतीय संरक्षण कामगार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या वेळी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे जाॅईन्ट सेक्रेटरी श्री. ज्ञानेश्वर जाधव संघटनेचे अध्यक्ष श्री गणेश टिंगरे, सरचिटणीस श्री संदिप वाळके, महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती शांताई लांडगे व पदाधिकारी, जे सि एम मेंबर, वर्क्स कमेटी मेंबर, कार्यकर्ते उपस्थित होते त्यांची ही मोहिम यशस्वी रित्या पार पडो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी महिलांना ट्रेकींक बाबतीत आवड निर्माण होवून सकारात्मक भावना व शारीरिक आणि मानसिक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे मनोगत श्रीमती वर्षा शेळकंदे यांनी नमूद केले आहे .

Previous articleसंकल्प युवा प्रतिष्ठाणकडून धामणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दफ्तरवाटप
Next articleबंद असलेल्या युके इंटरमीडिएट्स कंपनीमध्ये विषारी केमिकलची गळती