संकल्प युवा प्रतिष्ठाणकडून धामणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दफ्तरवाटप

राजगुरुनगर –  स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वहागाव (ता.खेड) येथील संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने धामणे जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर वाटप करण्यात आले. प्रतिष्ठाणचे राष्ट्रीय अध्यक्ष माणिक भवार, सुनिल नवले, विशाल जाधव, दिलीप नवले, राहूल नवले, सूरज भवार, गणेश सुतार, गोरख नवले सर यांनी याकामी पुढाकार घेतला. दफ्तरासोबतच प्रतिष्ठाणने सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटपही केले.

यावेळी सरपंच महेंद्र कोळेकर, उपसरपंच नंदा कोळेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिता कोळेकर, उपाध्यक्ष किरण कोळेकर, मुख्याध्यापक धर्मराज पवळे, अमर केदारी, मंगल निमसे, ग्रामसेविका सविता बोरकर आदि मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेसाठी खेळणी, संगणक, वाॅटर कूलर, ट्री गार्ड दिलेले बॅट्रीक्स कंपणीचे अधिकारी लवराज वैष्णव, मोफत दफ्तरवाटप केलेले संकल्प युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष माणिक भवार, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप केलेल्या बारामती फूड्सचे महाजन साहेब यांचे कृतज्ञता सन्मान करण्यात आले. पाचवीचे शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक अमर केदारी सर आणि जिल्हा गुणवत्ता यादीत चमकलेले गुणवंत विद्यार्थी वेदांत बारवेकर, समृद्धी कोळेकर, हर्षाली कोळेकर यांचे विशेष सन्मान करण्यात आले.

विद्यार्थ्यांची बहुभाषिक भाषणे आणि देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाला राष्ट्रप्रेमाचा अनोखा साज चढला.

भविष्यातही धामणे शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सूतोवाच संकल्पचे अध्यक्ष माणिक भवार, बॅट्रीक्स कंपणीचे अधिकारी लवराज वैष्णव यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मराज पवळे यांनी केले. सूत्रसंचालन गोरख नवले, अमर केदारी यांनी केले. तर मंगल निमसे यांनी आभार मानले.

Previous articleशिवतेज शेतकरी उत्पादन कंपनीचा शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रम
Next articleभारतीय मजदूर संघाच्या महिला ट्रेकिंग करिता हिमाचल प्रदेश मध्ये रवाना