शिवतेज शेतकरी उत्पादन कंपनीचा शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रम

नारायणगाव (किरण वाजगे)

बाळासाहेब ठाकरे कृषी ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत नारायणगाव येथील शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आणि महिंद्रा ॲग्री सोल्युशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मंजूर झालेल्या अद्ययावत पॅक हाऊस व शीतगृह प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आज नारायणगाव येथे उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या माजी गटनेच्या आशाताई बुचके, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, संतोषनाना खैरे, माजी सरपंच योगेश पाटे, कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, श्रीराम गाढवे, गुलाब नेहरकर, तहसीलदार रवींद्र सबनीस, कृषी अधिकारी सचिन खरमाळे, विकास दरेकर, संदीप वारुळे, जितेंद्र बिडवई, संतोष वाजगे, शिवतेज ऍग्रो शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सतीश पाटे, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, राजेंद्र वाजगे, राजेंद्र कोल्हे, तसेच परिसरातील बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र भोर, रेश्मा शिंदे यांनी केले तर आभार अवधूत बारवे यांनी मानले.

Previous articleकुराण शरीफ फाडल्याच्या निषेधार्थ नारायणगावात मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध
Next articleसंकल्प युवा प्रतिष्ठाणकडून धामणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दफ्तरवाटप