एकाला लिफ्ट घेणे पडले महागात ! चोरट्यांनी मारहाण करत लुटले, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

योगेश राऊत , पाटस

एका हवालदाराला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अगोदर गाडीवर बसवून थोड्या अंतरावर जाऊन जबर मारहाण करून त्यांच्या जवळील रक्कम आणि वस्तू लुटून फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे

ही घटना यवत पोलीस स्टेशन हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावरील बोरी ऐंदी जवळ घडली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आप्पासाहेब संभाजी हवालदार (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली.

मिळलेल्या माहिती नुसार, फिर्यादी हवालदार हे एमटेक कंपनीच्या गेट समोर सोलापुर-पुणे हायवे रोडवर त्यांच्या घरी जाण्यासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ दोन अनोळखी इसम आले आणि तुम्हाला उरुळी कांचन येथे सोडतो असे म्हणत फिर्यादीला काळे रंगाच्या बजाज डिस्कवर गाडीवर मध्यभागी बसवून बोरीऐंदी गावचे हद्दीत रोडच्या कडेला असणाऱ्या पत्रा शेड जवळील मोकळ्या जागेत घेऊन गेले.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला चाकू चा धाक दाखवून खाली पाडले तसेच एकाने अंगावर बसुन त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली आणि त्याच्या दुसऱ्या साथीदाराने त्यांच्या खिशातील मोबाईल व पॉकेट काढुन घेवुन हाताने व लाथाबुक्यांनी जबर माराहण केली…

यावेळी तेथे अजून दोन अनोळखी इसम आले आणि त्यांनीही फिर्यादीला हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. मारहाण करताना त्यांचेपैकी एका इसामाने फिर्यादीच्या तळहातावर चाकु मारून दुखापत केल्याने ते जीवे मारतील या भितीने फिर्यादी तेथुन कसेबसे पळुन जाण्यात यशस्वी झाले.

दरम्यान, आरोपींनी फिर्यादींचा १२ हजार रुपयांचा मोबाईल, ४०० रुपयांचे पॉकेट त्यामध्ये असलेले आधारकार्ड, ड्रायव्हींग लायन्सस, पॅन कार्ड, बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम कार्ड व ४०० रुपये रोख रक्कम चोरून नेली. घटनेचा अधिक तपास पोसई शेख करीत आहेत.

Previous articleनिगडाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगता समारंभ संपन्न
Next articleघोडेगाव – निसर्ग शाळा उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी घोडनदी काठी सहलीचा लुटला आनंद