घोडेगाव – निसर्ग शाळा उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी घोडनदी काठी सहलीचा लुटला आनंद

घोडेगाव – मोसीन काठेवाडी

घोडेगाव जिल्हा परिषद शाळेची निसर्ग शाळा या उपक्रमा अंतर्गत घोडनदी काठी निसर्ग सहल काढण्यात आली.पुणे येथील यशदा या संस्थेतील प्राध्यापिका व वनस्पती शास्त्रज्ञ श्रीमती रुपाली भोळे व सौ जगताप मॅडम,प्राध्यापक जगताप सर व शालेय व्यवस्थापन अध्यक्ष हेमंत काळे या मान्यवरांनी या शिबिरात सहभाग घेतला.

विविध वनस्पती विविध पक्षी नदीकाठाचे महत्व याची माहिती श्रीमती भोळे मॅडम यांनी दिली. विद्यार्थ्यानी विविध देशभक्तीपर गिते गायली.चित्रे काढली व अनुभवलेले क्षण लेखन करून ठेवले.विद्यार्थी यांनी सुगरण , वेडा राघु , पाकोळी , पाणकोंबडी, बगळा ,घार, बुलबुल इत्यादी पक्षी पाहिले . रानभाज्या, विविध झुडपे, वृक्ष , यांची उत्कृष्ट अशी माहिती मॅडमने सांगितले .

विद्यार्थी या एक दिवसीय निसर्ग शाळेत खुश झाले. घोडेगाव ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या वतीने सरपंच अश्विनी तिटकारे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी श्रीमती रुपाली भोळे मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.विद्यार्थी यांनी भोळे मॅडमला पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले या कार्यक्रमाचे नियोजन राजाराम काथेर व ललिता तुरे यांनी केले.

Previous articleएकाला लिफ्ट घेणे पडले महागात ! चोरट्यांनी मारहाण करत लुटले, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Next articleग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिर उत्साहात